खुशखबर! रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला

खुशखबर! रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला

खुशखबर! रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये रायगड किल्ल्याचा देखील समावेश होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमींनी अनलॉकच्या काळात रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर अखेर रायगड जिल्ह्याचे दरवाजे शिवप्रेमींसाठी उघडण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले आणि पर्यटन स्थळे तसेच स्मारके खुली करण्यास रायगडच्या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत शिवप्रेमींसाठी ही खुशखबर आहे. दरम्यान, इथे येणाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून गड-किल्ल्यांवर जाण्यास कोणालाही परवानगी दिली जात नव्हती. ही ठिकाणे खुली करावीत अशी मागणी विविध संस्‍था, संघटना, दुर्गप्रेमींकडून केली जात होती. तर दुसरीकडे आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासनाने ही स्थळे खुली करण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु, त्याची पूर्तता होत नव्हती, म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता जिल्‍हाधिकारी यांच्‍या आदेशामुळे रायगड किल्‍ल्‍याबरोबरच चवदार तळे आणि इतर गडकिल्‍ले या ठिकाणी प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवप्रेमींना आणि पर्यटकांना याचा आनंद घेता येणार आहे. शिवाय त्यावर आधारित रोजगार पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळे सर्वांनीच या निर्णयाचे कौतुक केले आहे.


हेही वाचा – निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला २६८ कोटींची मदत जाहीर


First Published on: November 13, 2020 5:59 PM
Exit mobile version