यंदा राखीचा अनोखा ट्रेंड; बहीण-भावाचे नाते रोपाच्या रूपाने होणार अधिक घट्ट

यंदा राखीचा अनोखा ट्रेंड; बहीण-भावाचे नाते रोपाच्या रूपाने होणार अधिक घट्ट

यंदा राखीचा अनोखा ट्रेंड; बहीण-भावाचे नाते रोपाच्या रूपाने होणार अधिक घट्ट

रक्षाबंधन काही दिवसांवर आले आहे. यंदा रक्षाबंधनाला आकर्षक आणि सुंदर दिसणाऱ्या अनोख्या खण राखीचा ट्रेंड पहायला मिळत आहे. निसर्गाशी एकरूप होण्यासाठी या खण राखीमध्ये रोपाच बी लपलेलं आहे. ही राखी काही दिवसांनी कुंडीत सोडायची आणि रोज पाणी घालायचे, सुंदर रोप रुजलं की आपल्या नकळतच ते वाढू लागेल. त्यामुळे बहीण भावाच्या नात्याची गाठ देखील अधिक घट्ट होईल. खण राखी म्हणजे निसर्गाशी मैत्री, स्वस्त मस्त आणि निसर्गाचं भान ठेवून बनवलेली खण राखी अशी टॅग देऊन खण राखीची सध्या ऑनलाइन विक्री सुरू आहे. एक खण राखी ५० रुपये अधिक शिपिंग तर ६ खण राखी ४० रुपये प्रत्येकी अधिक शिपिंग अशा प्रकारे उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर या राखीची विक्री व जाहिरात होत आहे.
 या  राख्या सुंदर, आकर्षक आहेत. शिवाय पर्यावरणपूरक व पर्यावरणस्नेही आहेत. वापर झाल्यावर कुंडी किंवा मातीत टाकल्यावर त्यातून रोप उगणार आहे. त्यामुळे आपोआप पर्यावरण जतन आणि संवर्धन  होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व ओळखीतून रायगड जिल्ह्यासह, पुणे, मुंबई व महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरून देखील या राख्यांना मागणी येत आहे. या राख्या नाममात्र किंमतीमध्ये कुरिअरने थेट घरी पाठविल्या जात आहेत. त्यासाठी रोहिणी ढवळे यांच्याशी संपर्क साधावा 8767640337
प्रत्येक बहिणीने जर अशी पर्यावरण पूरक खण राखी घेण्याचा संकल्प केला तर नक्कीच यंदाच्या पावसाळ्यात भरपूर रोप लावली जातील. आणि बहीण भावाच्या प्रेमापोटी वाढली देखील जातील.

First Published on: August 5, 2021 8:07 PM
Exit mobile version