ठाणे: निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

ठाणे: निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

ठाणे: निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्याने राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ठाण्यातील राबोडी येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी घटनास्थळवरून रिव्हॉल्व्हर हस्तगत केली असून राबोडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. तसचे पुढील तपास सुरू आहे.

मोहम्मद सादिक मोहम्मद शफी शेख (६८) असे आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्यांचे नाव आहे. मोहम्मद सादिक हे मुलासोबत ठाण्यातील कॅसल मिल, विकास कॉम्प्लेक्स येथील इमारतिच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्यात होते. त्यांची पत्नी नेरळ येथे विभक्त राहण्यात आहे.

शुक्रवारी सायंकाळी मुलगा घरी आला असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्यांच्या शेजारी रिव्हॉल्व्हर पडली होती. मुलाने ताबडतोब शेजाऱ्यांना कळवले.

दरम्यान ही घटनेची माहिती राबोडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मोहम्मद सादिक यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून रिव्हॉल्व्हर हस्तगत केली असून या रिव्हॉल्व्हरचा परवाना मोहम्मद सादिक यांच्या नावावरच असल्याची माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.शिरतोडे यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितली. मोहम्मद सादिक यांच्याकडे किंवा घरात कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट मिळून आलेली नसून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे शिरतोडे यांनी सांगितले. ययाप्रकरणी राबोडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.

First Published on: September 25, 2020 10:20 PM
Exit mobile version