देशात 300 बांबू रिफायनरी सुरू करा ; पाशा पटेल यांची मागणी

देशात 300 बांबू रिफायनरी सुरू करा ; पाशा पटेल यांची मागणी

देशाला इंधन आयातीवर हजारो कोटी रु.वाचवण्यासाठी 300 बांबू रिफायनरी सुरू कराव्यात अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पटेल म्हणाले की,डिझेल, पेट्रोल आयातीवर देशाला 8 लाख 50 हजार कोटी हुन अधिक रक्कम खर्च करावी लागते. इथेनॉल मिश्रीत पेट्रोल वापरण्याचे प्रमाण वाढल्यास या खर्चात बचत होऊ शकते. आणखी काही वर्षांत देशाला 1 हजार कोटी लिटरहून इथेनॉल लागणार आहे.

इथेनॉल ची ही गरज भागविण्यासाठी 17 लाख 60 हजार एकरवर बांबू लागवड करावी लागेल. बांबू रिफायनरी तून इथेनॉल ची वाढती गरज भागू शकेल.यातून शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळू शकेल.यासाठी 300 बांबू रिफायनरी सुरू कराव्यात, अशी मागणी आपण केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना भेटून केल्याचे पटेल यांनी सांगितले.


हे ही वाचा – Ind Vs Wi, 1000 ODI Match: १००० वा एकदिवसीय सामना खेळणारा भारत पहिलाच देश, असा आहे प्रवास?


 

 

First Published on: February 5, 2022 7:15 PM
Exit mobile version