आदिवासी तरुणाचा आगळावेगळा स्टार्टअप; १२० तरुणांना रोजगाराची संधी

आदिवासी तरुणाचा आगळावेगळा स्टार्टअप; १२० तरुणांना रोजगाराची संधी

आदिवासी तरुणाचा आगळावेगळा स्टार्टअप; १२० तरुणांना रोजगाराची संधी

डहाणू तालुक्यातील बापूगाव येथील तरुण उद्योजक सागर भोइर याने अनोखा उपक्रम हाती घेऊन बेरोजगारांसाठी एक रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सोबतच नवीन घरे बांधणाऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. पूर्वी घरकामांसाठी ६०० ते ७०० रुपये मजुरी द्यावी लागत होती. परंतु आता ३५० ते ४०० रु मजुरीवर कामगार उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी १२० तरुणांना बांधकाम, सुतारकाम, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर तसेच घरासंबंधी इतर कामाचे प्रशिक्षण देण्याचा सागर भोइरचा मानस आहे.

घरबांधणी आणि घरसंबंधी इतर कामांसाठी नवीन यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात येणार आहे. सोबतच टाकाऊ प्लास्टिक पासून घरातील इंटेरिअरचे काम करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील टाकाऊ कचऱ्याचा देखील कामामध्ये वापर होऊन प्रदूषण टाळण्यास मदत होणार आहे. पालघर जिल्ह्यात एक आगळावेगळा उपक्रम राबवला जाणार आहे. डहाणू पंचायत समिती सभापती स्नेहलता सातवी ह्यांनी सागरच्या कामाची दखल घेत त्याच्या एका उपक्रमाच्या कामाचे भूमिपूजन करून सागरला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामीण भागात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. ग्रामीण भागातील तरुण वर्ग रोजगारासाठी शहरी भागाकडे वळत आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन योग्य मोबदल्यात काम मिळावे यासाठी आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत. यात आम्हाला अजून सहकार्य लाभल्यास जास्तीत जास्त तरुणांना रोजगार देण्याचा आमचा मानस आहे.


हेही वाचा – वन विभागाची जागा बळकावण्याचा प्रयत्न


 

First Published on: February 24, 2021 10:55 PM
Exit mobile version