पालघर जिल्हयात शाळा सुरू करण्याचा निर्णय नाहीच; शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना परत पाठवले

पालघर जिल्हयात शाळा सुरू करण्याचा निर्णय नाहीच; शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना परत पाठवले

पालघरमधील पा.जा.हायस्कूल

पालघर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय अजून न झाल्याने पालघर जिल्ह्यातील नववी ते बारावी या इयत्तेतील विद्यार्थी वर्गाचं शिक्षणाबाबत अध्ययनाचे धोरण रखडले आहे. आज राज्यात बहुतांशी भागात तब्बल आठ महिन्यानंतर आज राज्य शासनाने नववी ते बारावी या विद्यार्थींना आज प्रत्यक्षात शिक्षणाचे धडे मिळणार होते. मात्र पालघर जिल्ह्यात याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने शाळेत आलेले विद्यार्थी हे शालेय प्रशासनाने परत पाठविण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा येथील पां.जा हायस्कूल आणि कॉलेजमध्ये आलेल्या विद्यार्थांना पाठविण्यात आले.

या ठिकाणी वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यातील दहावीची रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. या विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझर, मास्क, सामाजिक अंतर, थर्मल स्क्रिनिंग करून ही परीक्षा घेतली जात आहे. मात्र याबाबत लवकरच मीटिंग बोलावली जात असल्याची माहिती दिली जात होती. या बैठकीत ३१ डिसेंबरपर्यंत पालकांची परवानगी घ्यावी आणि ५ ते १० आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावी, असे निर्देश दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली जात आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला नाही आणि विद्यार्थी शाळेतून घरी परतले.

कोविड रोगाच्या पादुर्भाव रोखण्यासाठी बंद करण्यात आल्या होत्या. या शाळा तब्बल आठ महीने पासून बंद होत्या. २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार असे चित्र राज्यात होते. मात्र पालघर जिल्ह्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील प्रत्यक्ष अध्ययनबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला नाही त्यामुळे आज शाळेत येणाऱ्या विद्यार्थीवर्गाला माघारी फिरावे लागले.

शाळेत रिपीटर विद्यार्थी वर्गाची परिक्षा सुरू

पालघर जिल्ह्यातील पा.जा.हायस्कूल आणि काॅलेजमध्ये ४० विद्यार्थी शाळा सुरू झाली म्हणून आले होते. मात्र शाळेकडून त्यांना परत पाठविण्यात आले. तर याच शाळेत जुलै महिन्यादरम्यान रखडलेल्या हावी इयत्तेच्या पुरवणी परिक्षा, रिपीटर विद्यार्थी वर्गाच्या परिक्षा घेण्यात येत होत्या. या ठिकाणी येणाऱ्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना सॅनिटायझर हाताला लावूनच प्रवेश दिला जात होता. सोशल डिस्टन्स, मास्क या उपयोजनाचे पालन केले जात होते.

पालकांची संमती ३१ डिसेंबर पर्यंत घ्यावी

पालघर जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी माणिक गुरसल यांनी पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज संबधित अधिकारीवर्गाची बैठक झाली. ३१ डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांच्या पालकांची परवानगी घ्या, अशी सुचना केली असून आरोग्य विभागाने किमान ५ ते १० आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवण्यात यावीत असे ठरविण्यात आले.

First Published on: November 23, 2020 9:03 PM
Exit mobile version