Covid-19 नंतर Covid-22 चा धोका, डेल्टा व्हेरिएंटपेक्षा खतरनाक असल्याचा वैज्ञानिकांचा इशारा

Covid-19 नंतर Covid-22 चा धोका, डेल्टा व्हेरिएंटपेक्षा खतरनाक असल्याचा वैज्ञानिकांचा इशारा

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने (Delta variant ) संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत डेल्टा व्हेरिएंटचे अनेक रुग्ण समोर आले आहे. कोरोनाच्या आतापर्यंतच्या व्हेरिएंटमधील डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक घातक व्हेरिएंट होता. जग डेल्टा व्हेरिएंटशी लढत असताना नव्या व्हायरसची एंट्री होणार असल्याचे वैज्ञानिकांकडून सांगण्यात आले आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, येणाऱ्या काही वर्षात कोरोनाचे आणखी घातक व्हेरिएंट समोर येणार आहेत. स्विझरलँडच्या ईटीएच ज्यूरिख विश्वविद्यालयाच्या इम्यूनोलॉजिस्टने कोविड १९ नंतर कोरोनाचा सुपर व्हेरिएंट कोविड-२२ (Covid-19) येणार आहे. (New super corona variant Covid-22 is Dangerous than Covid-19)

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे येत्या काळात लोकांनी आणखी सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचा हा नवीन सुपर व्हेरिएंट जगासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. केवळ लसीकरण करुन या व्हेरिएंटविरोधात लढता येईल असे म्हणून चालणार नाही.

विश्वविद्यालयाचे इम्यूनोलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर साई रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यातील या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता त्याविरोधात लढण्यासाठी आरोग्य संघटनांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. या व्हेरिएंटसोबत लढण्यासाठी आणखी प्रभावी लसींची आवश्यकता आहे. ज्या लोकांनी कोरोना विरोधी लस घेतलेली नाही ते कोरोनाचे सुपर प्रेडर होऊ शकतात. कोरोनाचा सुपर व्हेरिएंट शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना देखील पुन्हा एकदा कोरोना संक्रणाचा धोका उद्भवू शकतो.

कोरोनाचा सुपर व्हेरिएंट कोविड-२२ विरोधात लढण्यासाठी डॉक्टर साई रेड्डींनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांचे लसीकरण करणे देखील महत्त्वाचे आहे. येणाऱ्या हिवाळ्याच्या मोसमात कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – Covishield लसीच्या दोन डोसमध्ये ८४ दिवसांचे अंतर का? केरळ हायकोर्टाची केंद्राला विचारणा

First Published on: August 24, 2021 6:41 PM
Exit mobile version