T20 WC – Ind vs Pak : पोलिसांमुळे धार्मिक तेढ टळली

T20 WC – Ind vs Pak : पोलिसांमुळे धार्मिक तेढ टळली

T20 WC - Ind vs Pak : पोलिसांमुळे धार्मिक तेढ टळली

समाज माध्यमातून भारताचा क्रिकेट सामन्यातील पराभवावर आक्षेपार्ह विधानानंतर मुस्लीम युवकाबद्दल झालेले संतप्त वातावरण बिघडू न देण्याची महत्त्वाची भूमिका पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी पार पाडल्याने सणासुदीला तणावासह धार्मिक तेढ टळण्यास मदत झाली आहे. ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारताची झालेली हार क्रिकेट रसिकांच्या जिव्हारी लागली असतानाच तालुक्यातील हाळ गावातील मुनीर पटेल या युवकाने भारताच्या पराभावबद्दल आक्षेपार्ह विधान समाज माध्यमात केले होते.

त्यानंतर तालुक्यात प्रचंड संताप व्यक्त होत होता. खोपोली, तसेच खालापूर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने नागरिक जमा होऊन संबंधितावर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले होते. पोलीस निरीक्षक विभुते यांनी कोणतेही धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेत मुनीरला ताब्यात घेत दंडाधिकार्‍यांसमोर उभे केले.चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर मुनीरला सोडण्यात आले असून, केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला आहे. त्याबद्दल त्याने समाज माध्यमावर क्रिकेट रसिकांची माफी देखील मागितली आहे. दिवाळी सणात तणाव निवळला असल्याने पोलिसांच्या कामाचे कौतुक होत आहे.


हे ही वाचा – Petrol Diesel Price: इंधन दरवाढ रोखायची असेल तर भाजपला पराभूत करा, नवाब मलिकांचे वक्तव्य


 

First Published on: November 4, 2021 9:34 PM
Exit mobile version