video : वर्षाला कोट्यावधींची मलई लाटली, RTO तील भ्रष्टाचाराची पोलीस अधिकाऱ्यानेच केली पोलखोल

video : वर्षाला कोट्यावधींची मलई लाटली, RTO तील भ्रष्टाचाराची पोलीस अधिकाऱ्यानेच केली पोलखोल

ठाण्यातील वाहतूक विभागात पोलिसांचा भ्रष्टाचार, पोलीस अधिकाऱ्यानेच केला आरोप

ठाणे, नवीमुंबई वाहतूक विभागातील भ्रष्टाचार, वसुली होत असल्याचा आरोप एका पोलिसानेच व्हिडिओ व्हायरल केला आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल भगवंतराव टोके यांनी म्हटलं आहे. ठाण्यातील भ्रष्टाचाराच्या टोळीच्या विरोधात सर्व पुरावे आणि तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी आपल्या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

भ्रष्टाचाराबाबत चहूकडे सुळसुळाट सुरू असताना मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल भगवंतराव टोके यांनी ठाणे नवी मुंबई पोलीस वाहतूक दलातील होत असणारा भ्रष्टाचार आपल्या व्हिडिओद्वारे चव्हाट्यावर आणला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ ठाणे पोलिसांच्या काळजावर घाव घालणारा ठरत आहे. या व्हिडिओमुळे वाहतूक पोलिसांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे .

मुंबई पोलीस दलात जामदार म्हणून काम करणारे सुनील टोके यांनी नवी मुंबई वाहतूक विभागातील क्रेनवर कार्यरत असणारे पोलिस अमलदार व खासगी गुंड यांच्या बेकायदेशीर वसुली बाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांना निवेदन दिलं आहे. पोलीस दलातील भ्रष्टाचारा बाबत तक्रार करणे तसेच उच्य न्यायालयात जनहितार्थ दाद मागणे हे कायदेशीर आहे की, बेकायदेशीर यावर उचित मार्गदर्शन करण्याची सूचना केली आहे.

ठाणे आयुक्तालयातील नारपोली वाहतूक विभागातील पोलीस नाईक विजय सोने यांनी भ्रष्टाचारासंदर्भांत आपण आवाज उठविल्याने धमकी देत तसेच ठाणे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब वाघमोडे पाटील व त्यांच्या वाहतूक विभागातील वसुली करणारे पोलीस अमंलदार नारपोलीचे क्रेन वरील विजय सोने व खासजी गुन्हेगार टोळीने ठाण्यात परत आले तर परत जाणार नाही अशी धमकी देण्याचे सत्र सुरू ठेवल्याचे टोके यांनी म्हटले आहे.

ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब वाघमोडे पाटील तसेच वाहतूक विभाग यांचे भ्रष्टाचार प्रकरणातील सर्वांचे व्हिडिओ व ऑडिओ उपलब्ध असल्याने जमादार टोके यांचे म्हणणे असून क्रेन वरील गुन्हेगारी टोळी तसेच वाहन चालकांना मारहाण करण्याचे आपल्याकडे पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला ठाणे व नवी मुंबईत येण्यास मज्जाव केला जात असेल तर, तो मी मोडून काढणार असून लवकरच या भागात आपण येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले दरम्यान या भ्रष्टाचारासंदर्भात एका पोलिसानेच एका व्हिडिओद्वारे आवाज उठविल्याने पोलीस दलात चलबिचल निर्माण झाली असून राज्याचे मुख्यमंत्री ,गृहमंत्री ,तसेच ठाण्याचे पोलीस आयुक्त या भ्रष्टाचरा संदर्भात काय निर्णय घेणार या बाबत कुतूहलाचा विषय ठरला जाणार आहे.


हेही वाचा : खरा विकास तुम्ही पाहिलाच नाही तो आता बघाल, MIMच्या आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचा टोला


 

First Published on: September 17, 2021 3:26 PM
Exit mobile version