घरताज्या घडामोडीखरा विकास तुम्ही पाहिलाच नाही तो आता बघाल, MIMच्या आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचा टोला

खरा विकास तुम्ही पाहिलाच नाही तो आता बघाल, MIMच्या आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचा टोला

Subscribe

आज त्यांनी माझ्या स्वागताचे पोस्टर केले होते. ह्याला विकास नाही म्हणत हा तुमच्यासाठी विकास आसेल आमच्यासाठी नाही.

काही जणांना वाटलं की कामे खुप चांगली झाली आहेत. म्हणून आज त्यांनी माझ्या स्वागताचे पोस्टर केले होते. असा उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या आंदोलनावर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागत करत एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी उपरोधीक आंदोलन केल आहे. जलील यांच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद विमानतळापासून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे पोस्टर दाखवले होते. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार जलील यांच्या आंदोलनावर पलटवार करत खरा विकास तुम्ही पाहिलाच नाही असे म्हटलं आहे.

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री कार्यक्रमादरम्या संवाद साधताना विरोधकांवर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, काही जणांना वाटलं की कामे खुप चांगली झाली आहेत. म्हणून आज त्यांनी माझ्या स्वागताचे पोस्टर केले होते. ह्याला विकास नाही म्हणत हा तुमच्यासाठी विकास आसेल आमच्यासाठी नाही. ज्यांनी ज्यांनी मला धन्यवाद म्हणून पोस्टर दाखवले आहेत त्यांना मला सांगायचे आहे की, खरा विकास तुम्ही पाहिलेलाच नाही आहे आता खरा विकास बघणार आहात. माझ्यावर फुले टाकली, मोर नाचवले हा जर तुमच्या लेखी विकास असेल तर तुम्हाला लख लाभो हा विकास आमचा नाही, आमचा विकास पुढे काय करणार आहोत हे सांगणार आहोत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी एमआयएमच्या आंदोलनावर पलटवार केला आहे.

- Advertisement -

एमआयएमकडून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध

एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये विकास केल्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करणार असल्याची खोचक टीका केली आहे. एमआयएमकडून सीएम ठाकरेंचे उपरोधिक स्वागत करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मराठवाड्यातील लोकांसाठी विरोध करण्यात येत असल्याचे जलील यांनी म्हटलं आहे. सत्ताधाऱ्यांनी मराठवाड्याच्या लोकांवर अन्याय केला आहे. शिवसेनेकडून पोस्टर काढून विकास केला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी काय काम केलं आहे ते स्पष्ट करावे. यामुळे एमआयएमचे सर्व कार्यकर्ते आंदोलन करण्याचे ठरवले असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन, MIM चा CM दौऱ्याला विरोध

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -