ठाण्यात ‘स्पा’च्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट उध्वस्त

ठाण्यात ‘स्पा’च्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट उध्वस्त

ठाण्यात 'स्पा'च्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट उध्वस्त

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका हॉटेल मधील ‘स्पा’च्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट ठाणे पोलिसांनी उध्वस्त केले असून ४ तरुणीची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध कासार वडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने केली आहे. सुटका करण्यात आलेल्या ४ ही तरुणी वेगवेगळ्या राज्यातील असून त्याची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंद नगर जवळ असणारे ‘द बायके सूरज प्लाझा’ या हॉटेलमध्ये भाडेतत्वावर देण्यात आलेल्या ‘इलिगंट स्पा अँड सलून’ या ठिकाणी स्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट चालवण्यात येत होते. याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली होती. पोलीस पथकाने बोगस ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक सुनिल चव्हाण, जमादार राजू महाले आणि पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने हॉटेलच्या सातव्या मजल्यावर सुरू असलेल्या स्पामध्ये मंगळवारी रात्री सुमारास छापा टाकला. या छाप्यात स्पा चालविणारा मोहम्मद जुनेद हबीबउल्ला शाह या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या तावडीतून या चार तरुणीची सुटकाही करण्यात आली आहे. शाह याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती अशोक कडलक यांनी दिली.


हेही वाचा – ठाणेकरांच्या जीवाशी खेळ; बोगस डॉक्टर पुरविणाऱ्या कंपनीला कोविड रुग्णलयाचे कंत्राट


 

First Published on: October 21, 2020 9:45 PM
Exit mobile version