वेबिनारमध्ये हेड मसाज घेणारा डॉक्टर होतोय व्हायरल

वेबिनारमध्ये हेड मसाज घेणारा डॉक्टर होतोय व्हायरल

वेबिनारमध्ये हेड मसाज घेणारा डॉक्टर होतोय व्हायरल

कोरोनाच्या महामारीमुळे मागील १ वर्ष हे मोठे आव्हानात्मक ठरले आहे. या वर्षात मानवाच्या समजूतदारी, धैर्य आणि क्षमतेची चाचणी घेतल्याचे जाणवले. परंतु या काळात घरी असल्यामुळे वेबिनार, व्हिडीओ कॉल्स, इत्यादी कामाच्या नवीन गोष्टींची वास्तविकता वाढली. व्हिडीओ कॉल सुरु असताना अनेकदा घोटाळे, मजेशीर आणि गंमतीदार घटना घडत असतात. परंतु एक वृद्ध व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्यक्तीचे नाव डॉ. के.के अग्रवाल आहे. डॉ. के.के अग्रवाल यांचे दोन व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलेच घुमाकूळ घालत आहेत. एक व्हिडीओ कोरोना लस घेतल्यानंतर सुरु असलेल्या लाईव्ह सेशनचा आहे. तर दुसरा वेबिनार सुरु असताना डोक्याची मसाज करत असल्याचा आहे.

पहिल्या व्हिडीओत डॉ. के.के अग्रवाल यांनी कोरोना लस घेतल्यावर लाईव्ह सेशनमध्ये संवाद साधत होते. यादरम्यान अग्रवाल यांचा फोन वाजतो. ते फोन उचलतात. तो फोन त्यांच्या पत्नीने केला होता. पत्नीने अग्रवाल यांना कुठे आहात असे विचारण्यास सुरुवात केली. ते उत्तरात म्हणतात की, आताच कोरोना लस घेतली आहे. असे म्हणताच पत्नीला राग येतो आणि माझ्याशिवाय कोरोना लस घेतलीच कशी असे म्हणते. यावर डॉ. अग्रवाल समजवत म्हणतात की, तुला सोमवारी कोरोना लस देण्यासाठी नेतो. परंतु पत्नी काहीही एकूण न घेता फोन ठेवते.

नेटकरी लाइव्ह सेशन दरम्यान पत्नीचा फोन कॉल घेऊ नये असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्याच वृद्ध व्यक्तीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते वेबिनार दरम्यान डोक्याची मसाज घेत असल्याचे दिसून आले आहे. यावरुन असे दिसत आहे की, डॉ. अग्रवाल यांना सोशल मिडीयावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि लाइव्ह सेशन कसे चालते हे समजत नाही. किंवा त्यांना माहीती असेलही परंतु त्यांना याची काही पर्वा नसेल.

महामारीदरम्यान नव्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याबाबत काही ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. अंतरा आणि एक्सेस मिडीया इंटरनॅशनल या कंपनीने सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० दरम्यान केले. यामध्ये या सर्वेक्षणात असे दिसले की, ज्येष्ठ नागरिक पुर्वीपेक्षा अधिक तंत्रज्ञानाचा वापर करतात.

या अहवालात असेही दिसून आले आहे की, वृद्ध आपल्या परिवारातील लोकांशी सोशली जवळीक आणि संभाषण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे शिकत आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाच्या वापरात कोरोनाची महत्त्वाची भूमिका आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जवळपास ७७% ज्येष्ठ लोक स्मार्टफोन संदेश आणि गप्पा मारण्यासाठी वापरतात.

First Published on: January 27, 2021 6:44 PM
Exit mobile version