नाग आणि घोणसच्या झुंजीत मांजरीने चढवला हल्ला अन…

नाग आणि घोणसच्या झुंजीत मांजरीने चढवला हल्ला अन…

नाग आणि घोणसच्या झुंजीत मांजरीने चढवला हल्ला अन...

सापांची इतर प्राण्यांसोबत झालेल्या झुंजीच्या तुम्ही अनेक घटना पाहिल्या असतील परंतु नाग आणि घोणस या विषारी सर्पांची झुंज तशी क्वचितच पाहायला मिळते. नाग आणि घोणसमध्ये सुरु असताना यामध्ये मांजरीने उडी घेत घोणस सापाला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. मांजरीने चक्का नागावर हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. परंतु साप आणि घोणसच्या झुंजीत घोणस गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे घोणसने आपले प्राण त्यागले आहेत. हि घटना सिडको विभागातील डीजीपीनगर क्रमांक एकमध्ये गणपती मंदिराजवळ घडला आहे. साप, घोणस आणि मांजर यांच्यातील झुंज ही प्रत्यक्षदर्शींनी पाहिला आणि चांगलाच अनुभवला आहे.

गणपती मंदिराच्या परिसरात विषारी जातीचा कोब्रा नाग आणि विषारी जातीचे घोणस यांच्यात तुफान झुंज सुरु होती. या दोघांची झुंज सुरु असताना तिथे एक भटके मांजर आले. नाग घोणस सापावर हल्ला करत असताना मांजरीने घोणसला वाचवण्यासाठी या झुंजीत नागावर हल्ला चढवला आणि नागासोबत झुंजायला लागले. नाग आणि मांजरीची झुंज पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अशा प्रकारचे दुर्मिळ चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

खुप वेळ ही नागाची आणि मांजराची झुंज सुरु होती. झुंज वाढतच चालल्याने तेथील नागरिकांनी सर्पमित्रांना माहिती दिली. सर्पमित्रांनी माहिती मिळाल्यावर लगेच घटनास्थळी पाचारण केले. तसेच नागाला ताब्यात घेतले. मांजराने मात्र तिथून पळ काढत पलायन केले. घोणस सापाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी नेत होते. परंतु घोणसने उपचार करण्यापूर्वीच आपले प्राण त्यागले होते. सर्पमित्रांनी नागाला पुन्हा जंगलात सोडले आहे.

First Published on: January 22, 2021 10:56 PM
Exit mobile version