Live Update: 23 जानेवारीला होणारे चिपी विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

Live Update: 23 जानेवारीला होणारे चिपी विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर
सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे येत्या २३ जानेवारीला मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्म दिनाचे औचित्य साधून उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. अजित पवार, नारायण राणे, सुरेश प्रभू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
गृहमंत्री अमित शहा आज बेळगाव दौऱ्यावर गेले आहेत. बेळगावात जाताच शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. ‘अमित शहा गो बॅक’च्या घोषणा शेतकरी देत होते. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
‘बिग बॉस’शोच्या टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकडचा मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये एका अपघातात मृत्यू झाला आहे.’बिग बॉस’शोची निर्माता कंपनी एंडमॉल शाइन इंडियासोबत गेल्या अनेक वर्षांपासून ती कार्यरत होती. मुंबई फिल्मसिटीमध्ये ‘बिग बॉस’च्या सेटवर अभिनेता सलमान खान सोबत ‘विकेंड का वार’च्या खास एपिसोडचे शूटिंगनंतर ती आपल्या एक्टिवावरुन घरी परतत होती. त्याचवेळी तिचा अपघात झाला.
एकनाथ खडेंसेंची आज पुन्हा ईडीच्या चौकशीसाठी हजर राहणार आहेत. १५ जानेवारीला ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची शुक्रवारी ईडीकडून सुमारे साडेसहा तास चौकशी करण्यात आली होती. आज त्यांना पुन्हा ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
मुंबई अहमदाबाद माहामार्गावर नालासोपारा ते वसई फाटा मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पुढील २ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत.
Swapnil Jadhav

चिपी विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर गेले आहे. त्यामुळे कोकणवासियांना पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे. सिधुदुर्गाच्या चिपी विमानतळाचे उद्घाटन २३ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नवनिर्मित चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या जन्म दिनाचे औचित्य साधले होते. परंतु काही कारणास्तव हा उद्घाटन सोहळा लांबणीवर गेला आहे.

Swapnil Jadhav

मला कॉंग्रेस नेत्यांना विचारायचे आहे, तुम्ही ४ पिढ्या देशावर राज्य केले, गरीब महिलांच्या घरात स्वयंपाकाचा गॅस का नाही? गरिबांसाठी शौचालय, वीज, घरे, आयुष्मान भारत योजना का नव्हती? कारण त्यांना गरीबी हटवायची नव्हती असे अमित शाह यांनी बेळगावातील दौऱ्यामध्ये म्हटले आहे.

Swapnil Jadhav

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांनी विधानसभेवर आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहेत. सर्वच पक्ष ताकदिनीशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच पश्चिम बंगालची विधानसभा निवडणुक शिवसेना लढवणार असल्याचे माहिती मिळत आहेत. याबाबतची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे.

First Published on: January 17, 2021 7:57 AM
Exit mobile version