ठाणे शहर पोलीस दलात मोठे फेरबदल, ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणे शहर पोलीस दलात मोठे फेरबदल, ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या

अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणे शहर पोलीस दलात मोठे फेर बदल करण्यात आलेले आहेत. गुरुवारी रात्री ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश पोलीस आयुक्तलयाकडून काढण्यात आले. त्यात खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे मानव संसाधन विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्या जागी खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून संजू जॉन यांची वर्णी लागली आहे.

काही वर्षांपूर्वी चकमक फेम प्रदीप शर्मा यांनी ठाण्यातील खंडणी विरोधी पथक नावारूपाला आणले होते. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून संधी मिळावी म्हणून अनेक अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली होती, त्यात गुन्हे शाखा घटक १चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजू जॉन हे सरस ठरले. ठाणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक अशा एकूण ४५ जणांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून त्यात ठाण्याच्या बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गुन्हेशाखा घटक ५च्या प्रभारी पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्याकडे भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपवण्यात आलेला असून शांती नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांची बदली कोपरी पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.

गुन्हेशाखा घटक २ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर अशोक होनमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे – कोनगाव पोलीस ठाणे, शंकर इंदलकर निजामपूरा ते – वपोनि भोईवाडा पोलीस ठाणे, दत्ता गावडे – कोपरी पोलीस ठाणे ते वपोनि बदलापूर पोलीस ठाणे, संजय साबळे – वपोनि विष्णू नगर पोलीस ठाणे, सचिन सांडभोर – वपोनि डोंबिवली पोलीस ठाणे, वनिता पाटील आर्थिक गुन्हे ते वपोनि. चितळसार पोलीस ठाणे, कन्हैयालाल थोरात – वपोनि विठ्ठलवाडी पोलीस ठाणे, दत्तात्रय ढोले वपोनि. वागळे इस्टेट, सुलभा पाटील – वपोनि. शीळडायघर , चंद्रकांत जाधव – विशेष शाखा, विकास घोडके वपोनि गुन्हे शाखा घटक, मधुकर भोंगे – वपोनि. शिवाजी नगर पोलीस ठाणे.

तसेच कालावधी संपलेल्या पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या विविध पोलीस ठाणे, गुन्हेशाखा, वाहतूक विभाग, विशेष शाखा आणि नियंत्रण कक्ष या विभागात करण्यात आलेल्या आहेत.


हेही वाचा – उल्हासनगर पालिका कर्मचाऱ्यांना १२,५०० दिवाळी बोनस!


 

First Published on: November 6, 2020 8:48 AM
Exit mobile version