कामगार,आदिवासींसाठी माथेरानमध्ये लसीकरण मोहीम

कामगार,आदिवासींसाठी माथेरानमध्ये लसीकरण मोहीम

कामगार,आदिवासींसाठी माथेरानमध्ये लसीकरण मोहीम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने ब्रेक द चेन राबविण्यात येत असून, कोरोना महामारी समूळ नष्ट करण्यासाठी कोविड लसीकरण मोहीम राबविली जात आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी देखील पुढाकार घेतला आहे. लॉकडाऊन काळात घोड्यांसाठी खाद्य, आदिवासी, तसेच स्थानिकांना धान्य किट वाटप रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. आता त्यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली.

पर्यटनावर अवलंबून असलेल्या माथेरानमध्ये आदिवासी बांधव, घोडा चालक, हात रिक्षाचालक, कुली व्यवसायिक, टॅक्सी चालक, तसेच हॉटेल कामगार आपली उपजीविका करत असतात. पर्यटकांना सेवा देणार्‍या, तसेच तळागाळातील उपेक्षित राहिलेल्यांपर्यंत लसीकरणाचा लाभ मिळावा यासाठी फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी, मुकेश अंबानी, तसेच माथेरानकरांवर विशेष प्रेम असलेले अनंत अंबानी यांच्या माध्यमातून रग्बी हॉटेल येथे लसीकरण मोहीम सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन आणि रिचर्स सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

लसीकरणाच्या चौथ्या दिवशी जवळजवळ २ हजार ५०० श्रमजीवींनी याचा लाभ घेतला. कर्जत तालुक्यातील नागरिकांचा लसीकरणाला वाढता प्रतिसाद पाहून फाऊंडेशनने १ हजार अतिरिक्त डोस उपलब्ध करून दिले असून, या मोहिमेचा एक दिवसांचा कालावधी वाढविण्यात आला. फाऊंडेशनच्यावतीने भरविण्यात आलेली लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी तुकाराम बावदाने, उमेश सावंत आणि माथेरान प्रेस क्लबने विशेष परिश्रम घेतले होते. याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत होत्या. उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, लसीकरणावेळी आवश्यक कागदपत्रे डोंगर दर्‍यांमध्ये राहणार्‍या आदीवासींकडे नसल्याने त्यांना लसीकरणापासुन वंचित राहावे लागत आहे. त्यांच्यासाठी शासनाने नियमांमध्ये शिथिलता देऊन पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा – ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह लवकरच भाजपमध्ये?


 

First Published on: August 20, 2021 9:28 PM
Exit mobile version