पनवेल महापालिका क्षेत्रातील शिक्षकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन

पनवेल महापालिका क्षेत्रातील शिक्षकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन

अलिबाग तालुक्यात मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरण सुरू

राज्य शिक्षण विभागाच्यावतीने १० ऑगस्ट रोजी ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा १७ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र, तिसर्‍या दिवशी म्हणजे १२ ऑगस्टला हा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. मात्र शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती मंगळवारी १७ ऑगस्टला पनवेल महापालिका क्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षक, स्पर्धेकरीता व शिक्षणाकरीता परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पालिका क्षेत्रातील शिक्षकांव्यतिरिक्त इतर नागरिकांचे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सोडून इतर लसीकरण केंद्रावरती लसीकरण करण्यात येईल. तसेच महाविद्यालयीन प्राध्यापकांचे लसीकरण होणार नाही. शिक्षकांनी लसीकरणासाठी येताना सद्यघडीला कार्यरत असलेल्या शाळेचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. अशी माहिती वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली आहे.

तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्यावतीने डॉक्टरांचा सत्कार

तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्यावतीने १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पनवेल महापालिकेच्या डॉक्टरर्स व परिचारिकेंचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. कोविड १९ च्या महामारीमध्ये पनवेल महापालिकेच्या वैद्यकिय पथकातील डॉक्टरर्स व परिचारिकांनी कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असताना देखील स्वत:चा जीव धोक्यात घालून आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार आणि वैद्यकिय आरोग्याचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याकरीता ॲन्टीजन व आरटीपीसीआर तपासणीचे वेळोवेळी आयोजन केल्याने, कारागृहातील कैद्यांमध्ये तसेच करागृह कर्मचाऱ्यांमध्ये कोविड१९ चा प्रादुर्भाव झाला नाही.

आतापर्यंत कारागृहामध्ये जवळपास साडेपाच हजार कैद्यांची ॲन्टीजन व आरटीपीसीआर टेस्ट्स करण्यात आल्या आहेत. तसेच अल्प प्रमाणात कोविड१९ चा प्रादुर्भाव झालेल्या कैद्यांवर पालिकेच्या डॉक्टरर्संनी वेळीच उपचार करून प्रसार रोखण्यास मदत केली. याच बरोबर कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्यावतीने कारागृहामध्ये विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेने केलेल्या सहकार्याबद्दल तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या वतीने महानगरपालिकेच्या अधिपरिचारिका यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढल्याचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचं रोखठोक उत्तर


 

First Published on: August 16, 2021 6:39 PM
Exit mobile version