घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढल्याचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचं रोखठोक उत्तर

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढल्याचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचं रोखठोक उत्तर

Subscribe

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातीचं राजकारण वाढल्याचा आरोप करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचं लिखाण वाचावं, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. शरद पवार आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे यांच्यावर न बोललेलं बरं. त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी प्रबोधनकारांचं लिखाण वाचावं. प्रबोधनकारांचं लिखाण त्यांना योग्य मार्ग दाखवेल, असा टोला शरद पवार यांनी लगावला. यावेळी शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणावरुन केंद्राने फसवणूक केल्याचा आरोप देखील केला. घटना दुरुस्तीने आरक्षण मिळेल हा गैरसमज असून, केंद्राकडून ओबीसींची शुद्ध फसवणूक होत आहे, असा घणाघात शरद पवार यांनी केंद्रावर केला.

- Advertisement -

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी एका मराठी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरु झालं, असा आरोप केला होता. हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

नवाब मलिक यांचं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, असा पलटवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलंय, कदाचित वाढत्या वयामुळे लक्षात राहत नसेल; शरद पवारांचा राज्यपालांना टोला


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -