म्युकरमायकोसिसची लक्षणे काय? झाल्यास काय कराल? काय नाही? केंद्रीय आरोग्यंमत्र्यांनी दिली माहिती

म्युकरमायकोसिसची लक्षणे काय? झाल्यास काय कराल? काय नाही? केंद्रीय आरोग्यंमत्र्यांनी दिली माहिती

कोविन पोर्टलमध्ये पुढील आठवड्यापासून हिंदीसह १८ भाषांचा समावेश, कोविड परीक्षण लॅब जोडणार

देशात सध्या कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांना म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार होत आहे. सामान्यपणे या आजाराला ब्लॅक फंगस म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. जागरुकता आणि लवकर निदान झाल्यास म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा प्रसार कमी होण्यास मदत होईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगतले आहे. म्युकरमायकोसिस म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत. म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यास काय काळजी घ्यावी आणि काय करु नये याविषयी काही महत्त्वाची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. जाणून घेऊया काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

म्युकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. वैद्यकीय आरोग्य समस्या असलेल्यांना हा आजाराचा सर्वाधित धोक संभवतो. या आजारामुळे रोगाशी लढण्याची नैसर्गिक शक्ती कमी होते. हा आजार फार दुर्मिळ आहे. मात्र महाराष्ट्रात काही दिवसांपासून त्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे म्युकरमायकोसिसचे योग्यवेळी निदान होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे लोकांमध्ये जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

म्युकरमायकोसिस कोणाला होतो?

वैरिकानाझोल थेरपी घेणाऱ्या व्यक्तीला त्याचप्रमाणे अनियंत्रित डायबिटिज असलेले रुग्ण, रक्तात साखरेचे प्रमाण वाढले असेल किंवा उपचारांदरम्यान स्टिरॉइड दिलेल्या रुग्णांमध्ये किंवा बरेच दिवस ICUमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग होण्याची शक्यता आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

डोळ्यांभोवती वेदना होणे किंवा डोळे लाल होणे, ताप येणे, डोकेदुखी,खोकला,श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताच्या उलट्या होणे, मानसिक स्थिती बदलणे ही म्युकरमायकोसिसची लक्षणे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

म्युकरमायकोसिसपासून वाचण्यासाठी काय कराल?


हेही वाचा – Corona Vaccine: देशात लसीकरणाला वेग येणार, भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’चा फॉर्म्युला शेअरींगची तयारी

First Published on: May 14, 2021 3:11 PM
Exit mobile version