माथेरान परिसराला सोनेरी झळाळी! सोनकी फुलल्याने पर्यटक खूश

माथेरान परिसराला सोनेरी झळाळी! सोनकी फुलल्याने पर्यटक खूश

माथेरान परिसराला सोनेरी झळाळी! सोनकी फुलल्याने पर्यटक खूश

पर्यटकांच्या आवडत्या गिरीस्थान माथेरान परिसरात पिवळ्या सोनकीच्या फुलांचे ताटवे तयार झाल्याने त्या ठिकाणी सोनेरी झळाळी आली आहे. यामुळे माथेरानच्या सौंदर्याला सोनकीच्या साज चढत असून, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी ही एक आगळी-वेगळी पर्वणी ठरत असल्याने ते कमालीचे खूश आहेत.मुंबई, पुणे या दोन्ही महानगरांच्या मध्यावर समुद्र सपाटीपासून ८०० मीटर अंतरावर माथेरान वसले आहे. जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या या शहरात जगाच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक आवर्जून भेट देतात. पर्यावरण संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये आजही वाहनांना बंदी असल्यामुळे घोड्यांची रपेट, मिनी ट्रेनचा रंजक प्रवास, लालमातीचा हळूवार होणार स्पर्श घरी जाईपर्यंत आपल्या सोबत राहतो. वन्यजीव, वनसंपदा याची तेथे रेलचेल आहे. जूनपासून सुरू होणार्‍या पावसाळ्यात माथेरानमध्ये २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडतो.

पाऊस जाताना सुरू होणार्‍या हिवाळ्यात डोंगर, दर्‍या बहरतात ते सोनकीच्या पिवळ्या फुलांनी.महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात असलेल्या कास पठारावर या दिवसात फुले बहरत असतात. अशीच परिस्थिती माथेरानमध्ये असते. या सोनकीच्या फुलांनी माथेरानचे डोंगर सोन्यासारखे लखलखत असतात. तर अनेकदा ही सोनकीची फुले नवरात्रीत देवीला वाहण्याची देखील परंपरा आहे. सोनकीची फुले रानटी जरी असली तरी ती सूर्यफुलाप्रमाणे भासतात. मात्र ती लहान असतात. वर्षातून एकदा बहरणार्‍या या फुलांमध्ये रमण्याची पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते. सध्या येणारे पर्यटक, तसेच निसर्गप्रेमी या सोनेरी झळाळीचा भरभरून आनंद घेताना दिसत असून, या ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.


हे ही वाचा – DA Hike : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ


 

First Published on: October 21, 2021 8:57 PM
Exit mobile version