व्हिडिओ गेम खेळून संपवला मोबाईलचा डेटा, थोरल्या भावानेच काढला धाकट्या भावाचा काटा!

व्हिडिओ गेम खेळून संपवला मोबाईलचा डेटा, थोरल्या भावानेच काढला धाकट्या भावाचा काटा!

online game

१२ वर्षांच्या छोट्या भावाने २३ वर्षांच्या मोठ्या भावाचा मोबाईल घेऊन व्हिडिओ गेम खेळला. ज्यामुळे मोबाईचा डेटा पॅक संपला आणि मोठ्या भावाने रागातून छोट्या भावा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना राजस्थानमध्ये जोधपूर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महामंदिर ठाणे क्षेत्रातील वीर दुर्गादास कॉलनीमध्ये भाड्याच्या दुकानात राहणारे कैलाशदान चारण, पत्नी आणि ५ मुलं राहत आहेत. १२ वर्षांच्या छोटा भाऊ रॉयने आपला मोठ्या भाऊ रमनचा मोबाईल व्हिडिओ गेम खेळण्यासाठी घेतला होता. त्यावेळेस व्हिडिओ गेम खेळून मोबाईलमधला डेटा पॅक संपला. यामुळे मोठा भाऊ रागवला आणि त्याने छोट्या भावावर चाकूने हल्ला करून त्याचा खून केला. मग तो छोट्या भावाला गच्ची सोडून गुपचूप घरातून पळून गेला.

जोधपुर एसीपी पूर्व दरजाराम बोस यांनी सांगितले की, ‘कैलाशदान चारण याचे कुटुंब गरीबीत जीवन जगत आहे. चारणने २३ वर्षांपूर्वी जपानी महिलासोबत आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर त्याला तीन मुलं आणि २ मुलगी झाल्या. मोठा मुलगा रमन मुलांना टेनिसचे प्रशिक्षण देत होता, पण त्याचे मानसिक अवस्था ठीक नव्हती. तसेच वडील कैलाशदान यांची देखील मानसिक स्थिती ठीक नव्हती.’

बुधवारी संध्याकाळी ७ वाजता मोठा भाऊ रमन आपल्या छोट्या भावाला गच्चीवर घेऊन गेला आणि रागाच्या भरात त्यांनी छोट्या भावाच्या छातीत चाकून घुसवून त्याला ठार मारले. त्यानंतर रमन तिथून फरार झाला. जेव्हा आई आणि बहीण दोघा भावाना शोधत-शोधत गच्चीवर आल्या तेव्हा त्यांना रॉय रक्ताने माखलेला दिसला. त्यानंतर रॉयला तात्काळ महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

माहितीनुसार, आरोपी मोठा भाऊ टेनिसचे प्रशिक्षण देऊन घर चालवत होता. रॉय हा सर्वात छोटा होता. रॉयला सतत मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळण्याची सवय होती. यामुळे मोठ्या भाऊ रमन खूप राग आला आणि त्याने रॉयला ठार मारले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अधिकृत कारणांचा खुलासा केला नाही आहे.


हेही वाचा – एका कॉलमुळे ३९ दिवसांत संसार मोडला


 

First Published on: November 20, 2020 12:41 PM
Exit mobile version