१ डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम; पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलेंडर होणार स्वस्त

१ डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम; पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलेंडर होणार स्वस्त

१ डिसेंबरपासून बदलणार 'हे' नियम; पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलेंडर होणार स्वस्त

सर्वसामान्य नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. कारण १ डिसेंबरपासून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यात पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलेंडरचे दर, बँकिंग आणि पेन्शनच्या नियमांचा समावेश आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात घोषणा या बदलणाऱ्या नियमांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून दर निश्चित केले जातात. यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घट झाल्याने येत्या काळात इंधानाच्या किंमतींवर देखील परिणाम होऊ शकतात. यामुळे १ डिसेंबरपासून इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पेन्शनर्सला जीवन पत्र जमा करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे हे जीवन पत्र एका वर्षासाठी वैध्य ठरवले जाईल. असे न केल्यास सरकारी पेन्शनर्सला पेन्शन मिळणे बंद होणार आहे.

१ डिसेंबरपासून देशात SBI चे क्रेडिट कार्ड वापरणे देखील महागणार आहे. तसेच EMI वर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा भार सोसावा लागणार आहे.

सणासुदीच्या दिवसांत स्वस्त होम लोन ऑफर आत्ता बंद होणार आहेत. कारण LIC हाऊसिंग फायनान्स ऑफर्स आत्ता ३० नोव्हेंबरुपासून बंद होत आहेत.

याशिवाय UAN- आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. असे न केल्यास १ डिसेंबरपासून तुमच्या खात्यात पीएफची रक्कम जमा होऊ शकणार नाही.


 

First Published on: November 29, 2021 7:33 PM
Exit mobile version