कानपुरात २०० च्या बनावट नोटा

कानपुरात २०० च्या बनावट नोटा

नोटबंदी करून अडीच वर्षांचा कालखंड उलटला असला तरी बाजारात बनावट नोटा थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यातच कानपूरमध्ये गेल्या १५ दिवसांत एक कोटी किंमतीच्या दोनशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कानपूरमधील सर्वोदय नगरमध्ये साधे पानपटीचे दुकान चालवणार्‍या दुकानदाराला गेल्या सहा दिवसांत तीनवेळा दोनशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या बनावट नोटांपैकी एक नोट सध्या त्याच्याकडे असल्याचेही या दुकानदाराने सांगितले. याप्रकरणी तथ्य आढळल्यास किंवा बनावट नोटा बाजारात आणणार्‍या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी योग्य पावले उचलली जातील, असे येथील अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रेम प्रकाश यांनी सांगितले.

खरी नोट कशी ओळखावी?

• नोटेच्या पुढील बाजूस असलेल्या २०० रुपयांचे चिन्ह आहे. ते चिन्ह जेव्हा उजेडाच्या दिशेने कराल तेव्हा दिसून येईल. तसेच नोटांवर महात्मा गांधी चित्र देखील दिसेल.

• समोरच्या बाजूला देवनागरी लिपीमध्ये दोनशे असे लिहले आहे. त्याचप्रमाणे नोटेच्या मागच्या बाजूला देखील देवनागरीत दोनशे असे लिहले आहे.

• नोटवर महात्मा गांधी यांचे चित्र व दोनशे रुपयांच्या वॉटरमार्कच्या स्वरुपात देखील आहे.

• नोटांवर हिरवा रंगाचा सुरक्षा धागा आहे. नोट क्रॉस करुन बघितल्यास हाच हिरवा धागा निळ्या रंगात दिसेल.

• नोटेच्या डावीकडे उन्नत स्वरूपात अशोकस्तंभही छापलेला असतो.

• नोट कधी छापण्यात आली यासाठी नोटवर छापण्यात आलेले वर्ष देखील असते.

First Published on: August 31, 2019 1:02 AM
Exit mobile version