‘हिंडनबर्गचा रिपोर्ट खोटा, कोणतंही रिसर्च केलं नाही”; अदानी ग्रुपचा दावा

‘हिंडनबर्गचा रिपोर्ट खोटा, कोणतंही रिसर्च केलं नाही”; अदानी ग्रुपचा दावा

Adani Group Replies To Hindenburg Report : अमेरिकन फर्म हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळू लागले आहेत. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हे आरोप बोगस आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी हिंडेनबर्ग रिसर्चवर योग्य संशोधन न केल्याचा आणि कॉपी-पेस्ट केल्याचा आरोप केला आहे. त्यात असंही म्हटले आहे की, त्यांनी एकतर योग्य संशोधन केलं नाही किंवा योग्य संशोधन केलं पण लोकांची दिशाभूल केली आहे.

एका वाहिनीला मुलाखत देताना सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी हा आरोप केलाय. हिंडेनबर्गच्या रिपोर्टवर अदानी समुहाने ४१३ पानी निवेदनातून उत्तर दिलंय. त्यानंतर सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना हिंडेनबर्गच्या रिपोर्टने उपस्थित केलेल्या प्रश्नांपैकी ८८ प्रश्नांना उत्तरं दिली. यातील ६८ प्रश्न हे बोगस आहेत आणि आमचे डिस्क्लोजर्स केवळ कट, कॉपी-पेस्ट केली आहेत, असा खळबळजनक आरोप केलाय. तसंच हिंडेनबर्गने हा रिपोर्ट केली एफपीओचं नुकसान करण्यासाठीच बनवला असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केलाय.

हिंडनबर्गलाही जाब विचारला पाहिजे…

जुगेशिंदर सिंह म्हणाले की, त्यांनी संशोधन केलंही असेल पण जाणूनबुजून जनतेची दिशाभूल केली हे वाईट असेल. हिंडेनबर्गलाही जाब विचारायला पाहिजे की त्यांनी रिपोर्टमध्ये ६८ बोगस प्रश्न का उपस्थित केले? उर्वरित २० प्रश्नांबाबत सिंग यांना विचारले असता ते म्हणाले की, अदानी समूह टीका का स्वीकारत नाही याचे हे प्रश्न आहेत. ते म्हणाले की, “आम्ही करतो, पण खोटं बोलणं आम्हाला मान्य नाही. एखाद्याच्या वैयक्तिक कौटुंबिक कार्यालयावर प्रश्न असल्यास, आम्ही त्यांची उत्तरे देऊ शकत नाही.” सीएफओ पुढे म्हणाले की, हिंडेनबर्गच्या खोट्या आणि चुकीच्या माहितीवर आधारित बनावट अहवालातही अदानी समूहाच्या व्यवसायाबाबत काहीही चुकीचे आढळले नाही. ते म्हणाले, ‘त्या अहवालातही आमच्या मूलभूत व्यवसायाबाबत काहीही आढळून आलेले नाही.’

हिंडेनबर्ग अहवालाचा दावा

गेल्या आठवड्यात हिंडेनबर्गने एक अहवाल प्रकाशित केला होता की, अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंगच्या फसवणुकीच्या नियोजनात गुंतलेला आहे. फर्मने अहवालात दावा केला आहे की त्यांनी समूहाच्या माजी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डझनभर व्यक्तींशी बोलले आहे, हजारो दस्तऐवजांची समिक्षा केली आहे आणि सुमारे अर्धा डझन देशांमध्ये उद्योगांच्या साइटला भेट देण्यात आली आहे.

First Published on: January 30, 2023 8:32 PM
Exit mobile version