दारू, सिगरेटची विक्री घटली भारतीय नागरिक सुधारले?

दारू, सिगरेटची विक्री घटली भारतीय नागरिक सुधारले?

भारतीय नागरिक सिगरेट आणि दारूवरील खर्च कमी करत आहेत. रोज लागणार्‍या वस्तूंबरोबरच दारू उत्पादनाची मागणी कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत. जूनच्या तिमाहीत बीयर आणि दारूंच्या विक्रीत २०१८ च्या जूनच्या तिमाहीच्या तुलनेत अनुक्रमे ५ आणि २ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर सिगरेटच्या विक्रीत साधारणत: ३ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

दारू आणि सिगरेटवरील कर वाढवल्यावर त्यांच्या विक्रीत घसरण होते. मात्र जूनच्या तिमाहीत कोणताही कर वाढवण्यात आलेला नसतानाही दारू आणि सिगरेटच्या विक्रीत घट झाली आहे. काही तज्ज्ञांच्या मते सिगरेट ओढणार्‍या व्यक्ती आता सिगरेटचे संपूर्ण पाकिट खरेदी न करता सुट्ट्या सिगरेट खरेदी करत आहेत. त्यामुळे सिगरेटच्या एकूण विक्रीवर आता परिणाम झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्यादरम्यान, दारू आणि सिगरेटच्या विक्रीवर परिणाम झाला होता. ब्रोकरेज कंपनी प्रभुदास लीलाधर यांच्या एक अहवालानुसार, आयटीसीच्या सिगरेटची विक्री यावेळी वाढलेली नाही. आर्थिक वर्ष २०२० च्या आगामी तिमाहीत सिगरेटच्या विक्रीत अजून घट होण्याची शक्यता आहे. भारतीय नागरिक हे दारू आणि सिगरेटपासून लांब रहात आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र दारू आणि सिगरेटची कमी झालेली विक्री काही शाश्वत नाही. सणांच्या दिवसांत पुन्हा त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

First Published on: August 15, 2019 1:39 AM
Exit mobile version