अर्थसंकल्प सादर होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

अर्थसंकल्प सादर होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासावर अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी पुढील तीन वर्षांत 38,000 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे. या शाळांमधून 3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. याशिवाय, अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी स्थापन करण्याची घोषणा केली.

दरम्यान, आता सोशल मीडियावर या अर्थसंकल्पाला अनेकजण ट्रोल करु लागले आहेत. या अर्थसंकल्पाकडून भारतीय नागरिकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, या अपेक्षा भंग झाल्याचा दावा आता सोशल मीडियावरुन नेटकरी करु लागले आहेत. या संबंधित मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

अर्थसंकल्प सादर होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

 

 

First Published on: February 1, 2023 4:31 PM
Exit mobile version