ऑक्टोबर महिन्यात बँकांना तब्बल ११ दिवस सुट्ट्या

ऑक्टोबर महिन्यात बँकांना तब्बल ११ दिवस सुट्ट्या

नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. आता तुम्हाला प्लॅनिंग करावे लागणार आहे. कारण ऑक्टोबर महिन्यात बँकेला भरपूर सुट्ट्या आहेत. दसरा, दिवाळी असे मोठे सण ऑक्टोबरमध्ये येत आहेत. आणि ऑक्टोबरमध्ये 11 दिवस बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे तुम्हाला बँकांची कामे आटपावी लागतील.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला 2 तारखेला बँकांना सुट्टी असेल. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती. त्यानंतर लगेच 6,7 आणि 8 ऑक्टोबरला बँकांचं काम बंद असेल. 6 ऑक्टोबरला रविवार असल्याने बँका बंद असतील. 12 ऑक्टोबरला महिन्यातला दुसरा शनिवार आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी आहे. 13 ऑक्टोबर तर हक्काचा दिवस. म्हणजे रविवार. त्यामुळे बँका बंद. महिन्याच्या शेवटी चार दिवस सुट्टी आहे. 20 ऑक्टोबरला रविवार आहे. 26 ऑक्टोबर हा महिन्यातला चौथा शनिवार आहे. त्यादिवशी बँकेचे व्यवहार बंद. त्यानंतर 27 ऑक्टोबर रविवार आणि दिवाळी. सगळीकडे उत्सवी वातावरण. 28 ऑक्टोबरला दिवाळीचा पाडवा. बँका बंद आहेत. 29 ऑक्टोबर भाऊबीज. त्यादिवशीही बँकांना सुट्टी आहे.

एकूणच या महिन्यात सुट्ट्यांचा सुकाळ आहे. सणवार असल्यानं सगळीकडे उत्सवी वातावरण आहे. तुम्ही आधीच चांगले प्लॅनिंग करा.

First Published on: September 30, 2019 1:40 AM
Exit mobile version