ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल १० दिवस बंद

ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल १० दिवस बंद

Bank

ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँकांची कामे रखडणार आहेत. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या यादीनुसार, ऑगस्ट महिन्यात देशातील बँका तब्बल 10 दिवस बंद राहणार आहेत. यात 12 ऑगस्ट – बकरी ईद, 15 ऑगस्ट -स्वातंत्र्य दिन या दोन दिवस देशातील सर्वच बँकांना अधिकृतरित्या सुट्टी आहे.

त्याशिवाय ऑगस्ट महिन्यात 4, 11,18 आणि 25 या दिवशी रविवार आहे. या चारही दिवशी नेहमीप्रमाणे बँकांना सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. या व्यतिरिक्त 10 आणि 24 ऑगस्टला दुसरा आणि चौथा शनिवार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी बँका बंद राहणार आहेत. यानुसार 8 दिवस देशातील सर्वच बँकांना सुट्टी असणार आहे.

याशिवाय 17 ऑगस्टला पारसी नूतनवर्ष असल्याने मुंबईत बँकेतील काम बंद राहील. तसेच मंगळवारी 20 ऑगस्टला श्री श्री माधव देव तिथी असल्याने आसाममध्ये बँका बंद राहतील. तर दुसरीकडे उद्या 3 ऑगस्टला हरियाली तीज हा सण साजरा होणार आहे. हा सण प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, चंदीगढ या ठिकाणी साजरा करण्यात येतो. त्यामुळे या राज्यातील बँका बंद राहणार आहेत.

तसेच दुसरीकडे 23 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती असल्याने राज्यात अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. त्याशिवाय 31 ऑगस्टला गुरु ग्रंथ साहिबा जी यांचा प्रकाश उत्सव आहे. हा उत्सव पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या राज्यात 31 ऑगस्टला बँका बंद राहणार आहेत.

First Published on: August 5, 2019 1:48 AM
Exit mobile version