Credit Score Improve Tips : क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी “या’ ४ गोष्टी लक्षात ठेवा, Loan मिळणे होईल सोपे

Credit Score Improve Tips : क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी “या’ ४ गोष्टी लक्षात ठेवा, Loan मिळणे होईल सोपे

Credit Score Improve Tips : क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी "या' ५ गोष्टी लक्षात ठेवा, Loan मिळणे होईल सोपे

अनेकदा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज काढावे लागते. मात्र कर्ज घेताना नेहमी आपला क्रेडिट स्कोअर बँकेकडून तपासला जातो. साधारपणे ७५० किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. अशाप्रकारे क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तींना बँकांनाही लोन देण्यास अडचण वाटत नाही. त्यामुळे अशा लोकांना बँकेकडून कर्ज आणि क्रेडिट कार्डसारख्या सुविधाही सहज मिळतात.

त्यामुळे जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना कमी व्याजदराने कर्ज मिळवता येते. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल आणि तो तुम्हाला वाढवायचा असेल तर आम्ही तुम्हाला ४ महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही क्रेडिट स्कोर सुधारु शकता.

कर्जाची रक्कम वेळच्यावेळी भरा

क्रेडिट स्कोअर वाढण्यास सर्वात मदतीचा भाग म्हणजे क्रेडिट पेमेंट आणि ईएमआयची रक्कम. ग्राहकाने आपले ईएमआय आणि क्रेडिट कार्डची रक्कम वेळच्यावेळी भरली पाहिजे. यामुळे क्रेडिट स्कोर नेहमी चांगला राहील. तुम्ही ईएमआय आणि क्रेडिट कार्डची रक्कम थेट बँकेतून ऑटोमोडमध्येही टाकू शकता. ज्यामुळे कोणत्याही चुकीशिवाय तुमची रक्कम वेळेत जमा होईल.

क्रेडिट कार्ड वापराचे प्रमाण मर्यादीत ठेवा

क्रेडिट युटिलायझेशन रेशो हा घेतलेल्या एकूण कर्ज मर्यादेचे प्रमाण असते. हा रेशो ३० टक्क्यांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण यापेक्षा तो जास्त असल्यास असे दिसते की, त्या व्यक्तीला खूप जास्त क्रेडिट घ्यायचे आहे. ज्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होतो.

क्रेडिट कार्डची शिल्लक रक्कम पूर्ण भरा

बहुतेक ठिकाणी पेमेंट करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड वापर करता. मात्र क्रेडिट कार्डची शिल्लक रक्कम वेळेवर भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारेल आणि तुमच्या पेमेंटवर कोणतेही व्याज लागणार नाही.
तुम्हाला क्रेडिट कार्डची शिल्लक रक्कम एकाच वेळी भरणे शक्य नसल्यास तुम्ही किमान देय रकमेपेक्षा जास्त रक्कम भरली आहे याची खात्री करावी.

एकाचवेळी अनेक कर्ज आणि क्रेडिड कार्ड घेणे टाळा

तुम्ही विविध प्रकारची कर्जे आणि क्रेडिट कार्ड घेणे देखील टाळले पाहिजे, कारण यामुळे तुमच्यावर ईएमआयचा बोजा पडतो, ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअरही खराब होतो.


mankhurd fire : मानखुर्दमधील प्लास्टिक गोदामाला भीषण आग, आगीत गोदाम जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

First Published on: November 12, 2021 11:40 AM
Exit mobile version