जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या व्याजदरात कपात

जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या व्याजदरात कपात

सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंडच्या (जीपीएफ) व्याजदरात कपात केली आहे. जुलै ते सप्टेंबर या काळासाठी आता ८ टक्क्यांच्या तुलनेत हे व्याज दर ७.९ टक्के करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे गत तिमाहीमध्ये जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि अन्य समान फंड्सचे व्याज दर ८ टक्के होते. हे संशोधित व्याज दर केंद्र सरकारचे कर्मचारी, रेल्वे आणि सुरक्षा दलाचे कर्मचारी यांच्या भविष्यनिधीवर लागू असतील.

आर्थिक वर्ष २०१९- २० साठी हे व्याज दर जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि इतर समान फंड्सवर लागू असतील, असे वित्त मंत्रालयाच्या एका अधिसूचनेत म्हटले आहे. हे दर १ जुलै २०१९ पासून लागू होतील.संंबंधित फंड्समध्ये जनरल प्रॉव्हिडंट फंड, कॉन्ट्रिब्यूटरी प्रॉव्हिडंट फंड, ऑल इंडिया सर्व्हिस प्रॉव्हिडंट फंड, स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड, जनरल प्रॉव्हिडंट फंड (संरक्षण सेवा), इंडियन ऑर्डनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड, इंडियन ऑर्डनन्स फॅक्ट्रीज वर्कमेन्स प्रॉव्हिडंट फंड, इंडियन नेव्ही डॉकयार्ड वर्कमेन्स प्रॉव्हिडंट फंड, डिफेन्स सर्व्हिस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड, आर्म्ड फोर्स पर्सनल प्रॉव्हिडंट फंड यांचा समावेश आहे. सरकारने यापूर्वी ऑक्टोबर- डिसेंबरसाठी जीपीएफ व्याजदरात वाढ केली होती. तेव्हापासून या दरात बदल केला नव्हता. यापूर्वी सरकारने जुलै ते ऑगस्ट या कालावधीसाठी पीपीएफ आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांसह छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कपात केली होती.

First Published on: July 19, 2019 5:18 AM
Exit mobile version