१० लाख नोकर्‍यांवर येणार गंडांतर

१० लाख नोकर्‍यांवर येणार गंडांतर

Vehicle

वाहनांच्या विक्रीत होणारी कमालीची घट आणि जीएसटीचा वाढलेला बोजा यामुळे देशातील वाहन उद्योग क्षेत्रावर मंदीचे ढग वावरू लागले आहेत. सरकारने हस्तक्षेप करून या समस्यांवर उपाय न केल्यास या क्षेत्रातील १० लाख नोकर्‍यांवर गंडांतर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाहनांचे सुटे भाग तयार करणार्‍या कंपन्यांनी जवळपास ५० लाख लोकांना रोजगार दिला आहे. या कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या वाहन सुटे भाग उत्पादक संघटनेने मंदीच्या काळ्या छायेतून बाहेर पडण्यासाठी सरकारने जीएसटी १८ टक्क्यांवर आणण्याची आणि इलेक्ट्रिक वाहनांसंबंधी स्पष्ट धोरण असण्याची मागणी केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष राम वेंकटरामानी यांनी सांगितले की, वाहन उद्योगाला मंदीच्या झळा बसत आहेत. वाहनविक्री गेल्या काही महिन्यांत घटली आहे. सुटे भाग बनविणार्‍या कंपन्या वाहन उद्योगांवर अवलंबून आहे. वाहनांची मागणी नसल्याने उत्पादनही १५-२० टक्क्याने घटले आहे. त्याचा फटका सुटे भाग बनविणार्‍यांना कंपन्यांना बसू लागला आहे. हाच ट्रेंड कायम राहिल्यास येत्या काळात १० लाख लोकांच्या नोकर्‍या धोक्यात येऊ शकतात, अशी भीती व्यक्त करून, वेंकटरामानी यांनी काही ठिकाणी ही प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: July 26, 2019 4:36 AM
Exit mobile version