BYJU’S चे सीईओ रवींद्रन यांच्या घर-कार्यालयावर ED चे छापे

BYJU’S चे सीईओ रवींद्रन यांच्या घर-कार्यालयावर ED चे छापे

UPSC अभ्यासक्रमात अयोग्य माहिती प्रसिद्ध केल्याने, बायजूचे मालक रवींद्रन यांच्याविरोधात गुन्हा दाखल

भारतीय मल्टिनॅशनल एज्युकेशनल टेक्नोलॉजी कंपनी BYJU’S चे मुख्य कार्यकारी प्रमुख (CEO) रवींद्रन बायजू (Raveendran Byju) यांच्या बंगळुरु येथील कार्यालय आणि घरावर ईडीने छापेमारी केली आहे. या संबंधी ईडीने सांगितले आहे, की शनिवारी एज्युकेशनल सेक्टरमधील मोठी कंपनी बायजूजचे सीईओ रवींद्रन यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली, त्यात काही आक्षेपार्ह कागदपत्र आणि डिजिटल डाटा जप्त करण्यात आला आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत तीन ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. त्यात दोन व्यवसायिक प्रतिष्ठान आणि एका निवासी ठिकानाचा समावेश आहे. रवींद्रन बायजू आणि त्यांची कंपनी थिंक लर्न प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी छापे पडले आहेत.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत काही आक्षेपार्ह कागदपत्र आणि डिजिटल डाटा जप्त करण्यात आला आहे. बायजूज संदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या, त्याआधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. रवींद्र बायजू यांना ईडीने अनेकदा समन्स बजावले होते, मात्र ते चौकशीला कधीही हजर झाले नाही. त्यामुळे तपास यंत्रणेने ही कारवाई केली आहे.

परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून २८ हजार कोटी मिळाले
रवींद्रन बायजू यांची कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडला २०११ ते २०२३ दरम्यान थे
परकीय गुंतवणुकीच्या (FDI) माध्यमातून २८ हजार कोटी रुपये मिळाले. तसेच कंपनीनेही या काळात एफडीआयच्या माध्यमातून विविध परदेशी कंपन्यांना ९,७५४ कोटी रुपये पाठवले होते.

First Published on: April 29, 2023 6:45 PM
Exit mobile version