ट्विटर खरेदीचा करार स्थगित, इलॉन मस्क यांनी ट्विट करून दिली माहिती, सांगितले ‘हे’ मोठे कारण

ट्विटर खरेदीचा करार स्थगित, इलॉन मस्क यांनी ट्विट करून दिली माहिती, सांगितले ‘हे’ मोठे कारण

काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरला ४४ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार केला होता. मात्र, हा करार आता काही काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. इलॉन मस्क यांनी स्वतः ट्टिवट करत ही माहिती दिली आहे.

मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले की, स्पॅम आणि बनावट खात्यांमुळे हा करार थांबवण्यात आला आहे. ट्विटरच्या एकूण युजरबेसमध्ये स्पॅम किंवा बनावट खाती 5 टक्क्यांहून कमी असल्याचे आढळून येईपर्यंत हा करार थांबवण्यात आला आहे. दरम्यान, ट्विटरने अलीकडेच माहिती दिली होती की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त 5 टक्के स्पॅम किंवा बनावट खाती आहेत. ट्विटर डील होल्ड केल्याची बातमी येताच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. प्री-मार्केटमध्ये कंपनीचा शेअर 11 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. त्याच वेळी टेस्लाचा शेअर्स 5 टक्क्यांनी वाढला.

एलोन मस्कने हा करार स्थगित केल्याने  ट्विटर बोर्डमध्ये गोंधळ उडाला आहे. ट्विटरने दोन कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. काढून टाकलेल्या दोन कर्मचार्‍यांमध्ये ट्विटरचे महाव्यवस्थापक कायवान बॅकूर आणि कंपनीचे महसूल आणि उत्पादन प्रमुख ब्रूस फॉक यांचा समावेश आहे.

ट्विटर विकत घेण्यासाठी मस्क यांनी १९ गुंतवणूकदारांकडून ७ अब्ज डॉलर म्हणजेच ५० हजार कोटी रुपयांचा निधी यांनी उभारला आहे. ओरॅकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन हे मस्कच्या गुंतवणूक प्रस्तावाचा भाग असणार्‍या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. याशिवाय, सौदीचे क्राउन प्रिन्स अलवालीद बिन तलाल बिन अब्दुलअजीझ अलसौद यांनी मस्क यांना ट्विटर शेअर्स खरेदी करण्यासाठी 35 दशलक्ष डाॅलर देण्याचे वचन दिले आहे.

ट्विटर विकत घेण्याचा हा करार ४४ अब्ज डॉलरचा आहे. करार पूर्ण करण्यासाठी ट्विटरच्या नावावर 13 अब्ज डाॅलर कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. टेस्ला शेअर्सवर 12.5 अब्ज डाॅलर मार्जिन कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे, उर्वरित रक्कम मस्क स्वतःच्या खिशातून टाकणार आहेत. मस्क यांनी 14 एप्रिल रोजी ट्विटरला आपला प्रस्ताव दिला होता.तर 21 एप्रिल रोजी मस्क यांनी ट्विटरला बँकांकडून  कर्ज मिळण्याची वचनबद्धता सादर केली. त्यानंतरच ट्विटरने या कराराला ग्रीन सिग्नल दिला.

 

First Published on: May 13, 2022 5:37 PM
Exit mobile version