पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा मार्ग उत्तर प्रदेशातून : शहा

पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा मार्ग उत्तर प्रदेशातून : शहा

Amit Shah

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची करण्याचे लक्ष्य गाठण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी येथे म्हणाले. या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्तर प्रदेश स्वत:चा वाटा एक ट्रिलियन उचलेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘मी हे ऐकले होते की, देशाचे पंतप्रधान बनण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. तसेच भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचा मार्गही राज्यातून जातो’, असे अमित शहा यांनी म्हटले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात भाषणात उत्तर प्रदेशमध्ये एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे सामर्थ्य असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, हे लक्ष्य मोठे असले तरी राज्यात आवश्यक तेवढी संसाधने आणि मनुष्यबळ असल्यामुळे ते गाठणे अशक्य नाही.

65 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या औद्योगिक प्रकल्पांच्या दुसर्‍या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. पंतप्रधाान नरेंद्र मोदी यांनी येत्या पाच वर्षांत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताला स्थान मिळवून देण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्याचे शहा यांनी सांगितले. पाच ट्रिलियन डॉलर्सच्या लक्ष्यामागे हा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक व्यावसायिक, उद्योजक यावेळी उपस्थित होते.

First Published on: July 30, 2019 4:11 AM
Exit mobile version