दिवाळीत विमानांचे तिकीट वाढणार

दिवाळीत विमानांचे तिकीट वाढणार

तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत विमान प्रवासाचे प्लॅनिंग करत आहात काय? मग आताच तिकीट बुक करा. कारण विमानाचं तिकीट महाग होऊ शकते. आधीच्या सणांच्या वेळचे देशातल्या विमानाचे तिकीट पाहता तुलनेने यावेळचे अजून महाग झालेले नाही. पण ते होऊ शकते.

फायनॅन्शियल एक्सप्रेसच्या बातमीनुसार सध्या विमानाची भाडेवाढ झालेली नाही. कारण यावेळच्या सीट्स जास्त आहेत. कमी भाड्याची विमानं स्पाइसजेट आणि इंडिगो आपल्या विमानांच्या संख्येत वाढ करतेय. सप्टेंबरपासून सगळीकडे सणवार सुरू होतायत. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे लागोपाठ सण येतायत. या काळात विमानाचे दर वाढतात. कारण सणासुदीला मागणीही जास्त असते.

5 महत्त्वाच्या मार्गांवर विमानाचे दर वाढले आहेत. दिल्ली-मुंबई, दिल्ली-बंगळुरू, दिल्ली-चेन्नई, दिल्ली-हैदराबाद आणि दिल्ली-कोलकत्ता या मार्गावरचे विमान दर 39 टक्के वाढलेत. ट्रॅव्हल पोर्टल क्लियरट्रिपच्या म्हणण्याप्रमाणे 15 दिवसांच्या आत तिकीट बुक केलेत तर फारसा बदल झालेला नाही. पण दक्षिणेकडे आलेले पूर आणि पाऊस यामुळे विमान दरात वाढ झाली आहे.

First Published on: August 14, 2019 1:01 AM
Exit mobile version