सोन्याच्या किमतीत जोरदार घसरण, 5000 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा

सोन्याच्या किमतीत जोरदार घसरण, 5000 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमकुवत ट्रेंडमुळे गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 66 रुपयांनी घसरून 50,516 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 50,582 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. मात्र, चांदीचा भाव 101 रुपयांनी वाढून 56,451 रुपये प्रतिकिलो झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो प्रतिकिलो 56,350 रुपयांवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,630.8 डॉलर प्रति औंस होता, तर चांदीचा भाव 18.46 डॉलर प्रति औंस झाला.

सोने 5000 रुपयांनी मिळतेय स्वस्त
या वर्षी मार्चमध्ये सोन्याचा भाव 55,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. म्हणजेच यंदाच्या विक्रमी उच्चांकापेक्षा यावेळी सोने सुमारे 5000 रुपयांनी स्वस्त आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याज वाढवण्याच्या शक्यतेमुळे डॉलरच्या मजबुतीमुळे आणि यूएस ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाल्यामुळे COMEX (कमोडिटी मार्केट) मधील स्पॉट गोल्ड तीन आठवड्यांहून अधिक काळ फ्लॅट राहू शकेल. दर सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
तुम्ही घरबसल्या बीआयएस केअर अॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकता. सोन्याचा परवाना क्रमांक, हॉलमार्क किंवा नोंदणी क्रमांक चुकीचा असेल तर तुम्ही थेट सरकारकडे तक्रार करू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी काय कारवाई केली, याचीही माहिती मिळेल.

मिस्ड कॉलवरून सोन्याचे दर जाणून घेणे खूप सोपे 
विशेष म्हणजे हे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.


हेही वाचाः पवार, शेलार पॅनलचे अमोल काळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष

First Published on: October 21, 2022 10:51 AM
Exit mobile version