गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होणार

गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दरात 0.35 टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय वित्तीय धोरण समितीने (MPC) बुधवारी रेपो दरात 0.35 टक्कांची कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर रेपो दर 5.40 टक्के इतका झाला आहे. तर, रिव्हर्स रेपो दर 5.15 टक्के इतका करण्यात आला आहे.

रेपो दर (तो व्याज दर, ज्यावर आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज देते) 5.75 टक्के होता. जो सप्टेंबर 2010 नंतरचा सर्वात कमी दर होता. त्यानंतर आरबीआयने तीन वेळा रेपो दर 0.75टक्के केला. या कपातीचा लाभ बँका आपल्या ग्राहकांनी देतील जेणेकरुन गृह, वाहन आदी कर्जे स्वस्त होतील व मासिक हप्ते कमी होतील, अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, शक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी आल्यानंतर सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on: August 8, 2019 1:28 AM
Exit mobile version