आता परदेशातही करता येणार UPI Payments, ‘या’ बँकेने सुरु केली सेवा

आता परदेशातही करता येणार UPI Payments, ‘या’ बँकेने सुरु केली सेवा

आता परदेशातही करा UPI Payments, 'या' बँकेने सुरु केली सेवा

डिजिटल पेमेंट युजर्समध्ये UPI हा एक अतिशय लोकप्रिय पेमेंट मोड आहे. आतापर्यंत फक्त भारतातूनचं UPI पेमेंट करण्याची सुविधा होती मात्र आता या बँकेने परदेशातूनही UPI पेमेंट करण्याची सेवा सुरु केली आहे.

इंडसइंड बँक सुरु केली सेवा

इंडसइंड बँकने आता परदेशात काम करणाऱ्या भारतीयांना त्यांच्या घरी पैसे पाठविण्यासाठी क्रॉस-बॉर्डर यूपीआय आयडी पेमेंट सेवा सुरु केली आहे. यासाठी बँकेने नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत हातमिळवणी केली आहे.

या अंतर्गत बँक आपल्या मनी ट्रान्सफर ऑपरटर्स (MTO) युजर्सला UPI ID द्वारे परदेशातून पैसे घेण्याची परवानगी देईल. अशाप्रकारे, इंडसइंड बँक ही UPI द्वारे परदेशातून पेमेंटची सुविधा देणारी देशातील पहिली बँक ठरली आहे.

थायलंडमधून सुरू झाली पहिली सेवा

इंडसइंड बँकेने सध्या थायलंडमध्ये ही सेवा सुरू केली आहे . थायलंडची मनी ट्रान्सफर कंपनी DeeMoneyने इंडसइंड बँकेच्या चॅनेलचा वापर करून UPI ​​पेमेंट्स सेवा NPCI शी कनेक्ट करेल. यानंतर, UPI आयडी ज्याला पेमेंट करु शकता. हा पेमेंट थेट संबंधीत व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल.

यासाठी, जर एखाद्या व्यक्तीला थायलंडमधून पैसे पाठवायचे असतील, तर तो DeeMoney च्या वेबसाइटवर पैसे पाठवणाऱ्याचा यूपीआय आयडी टाकेल आणि व्हेरिफाय केल्यानंतर तो पैसे ट्रान्सफर करू शकेल.

बँक डिटेल्सची गरज नाही

परदेशातून UPI ​​द्वारे पेमेंट करणे खूप सोपे आणि जलद काम होईल. कारण यासाठी फक्त UPI आयडी आवश्यक असेल. यासह, पाठवणाऱ्यांना खात्याची माहिती आणि समोरचा IFSC कोड लक्षात ठेवण्याची गरज नाही. तसेच लांब फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही.


 

First Published on: December 28, 2021 2:49 PM
Exit mobile version