गुड न्यूज… एक बिलियन डॉलर रेव्हेन्यू मिळाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना Apple iPad गिफ्ट करणार ‘ही’ कंपनी

गुड न्यूज…  एक बिलियन डॉलर रेव्हेन्यू मिळाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना Apple iPad गिफ्ट करणार ‘ही’ कंपनी

मुंबई | आयटी क्षेत्रातील कॉफोर्ज कंपनीने (Coforge Company) १ अब्ज कमाईचे लक्ष ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने कर्मचाऱ्यांना भेट स्वरुपात (Gifts) अॅपल आयपॅड (Apple iPad) देण्याची घोषणा केली आहे. कोफोर्ज कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटले की, कंपनीने १ अब्ज कमाईचे लक्ष गाठल्यानंतर कर्मचाऱ्यांना अॅपल आयपॅड भेटवस्तू म्हणून देणार आहे.

सध्या कोफोर्ज कंपनीमध्ये २१ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत, अशी माहिती कंपनीच्या वेबसाईटवरून मिळाली आहे. कोफोर्ज कंपनी कर्मचाऱ्यांना अॅपल आयपॅड भेट देण्यासाठी ८०.३० कोटी रुपये खर्च करणार आहे. कंपनीने गुरुवारी २७ एप्रिलला आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या त्रैमासिक निकाल जाहीर केला. आर्थिक वर्षाच्या त्रैमासिक कोफोर्जचा स्टँडअलोन नफा ४५ टक्क्यांनी घसरून ११५ कोटी रुपये झाला आहे. तसेच, कंपनीचा खर्च वगळून, त्रैमासिक उत्पन्नात २३२.७ कोटी रुपये झाला असून दरवर्षीच्या तुलनेत १२.१ टक्क्याने वाढ दर्शविली आहे. यंदाच्या आर्थिक २०२३ वर्षात पहिल्यांदा कंपनीचा महसूल १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे.

कंपनीचे सीईओ सुधीर सिंग म्हणाले, “गेल्या तिमाहीमध्ये दोन मोठे यश संपादन केले आहे. यात पहिले यश डॉलरच्या तुलनेत ५ टक्के वाढ झाली आहे. तर, दुसरे म्हणजे कंपनीला १ अब्जाची कमाई झाली आहे. त्याबरोबर २०२३-२४ या वर्षात देखील कंपनी चांगली कामगिरी करेल”, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – अॅपल कंपनीचे मुंबईतील पहिले स्टोअर सुरू

अॅपल कंपनीचे देशात दोन स्टोअर सुरू

टेक विश्वात अधिराज्य करणाऱ्या अॅपल कंपनीचे भारतातील पहिले स्टोअर मुंबईत मंगळवारी (१८ एप्रिल) सुरू झाले आहे. अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांच्या हस्ते मुंबईतील स्टोअर सुरू झाले आहे. तर अॅपलचे दुसरे स्टोअर दिल्लीत २० एप्रिलला सुरू झाले आहे. यानंतर आता अॅपल कंपनीचे भारतात मुंबई आणि दिल्ली या दोन मोठ्या शहरात स्टोअर आहे.

First Published on: April 29, 2023 8:05 PM
Exit mobile version