IRCTC च्या ‘या’ फीचरमुळे तत्काळ तिकीट क्षणार्धात होईल बुक, एजंटच्याही फेऱ्या माराव्या लागणार नाहीत

IRCTC च्या ‘या’ फीचरमुळे तत्काळ तिकीट क्षणार्धात होईल बुक, एजंटच्याही फेऱ्या माराव्या लागणार नाहीत

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकांना घरी जायचे असते. पण रेल्वेचे तिकीट मिळणे अवघड होऊन बसते. वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यताही खूप कमी असते. अशा परिस्थितीत तुम्ही तात्काळ तिकीट बुक करू शकता. तात्काळ तिकीट बुकिंग २४ तास अगोदर करता येते. परंतु, ज्या मार्गांवर जास्त प्रवासी आहेत, त्या मार्गांवर तत्काळ तिकीट मिळणेही अवघड आहे. त्यामुळे अनेक वेळा एजंटांच्या फेऱ्याही माराव्या लागतात.

तुम्हाला तिकीट मिळण्यात अडचण येत असेल तर आता चिंता करण्याची कारण नाही. कारण काही टिप्स फॉलो करून तुम्ही तात्काळ तिकिटे सहज बुक करू शकता. यासाठी तुम्हाला IRCTC अॅप आणि मास्टर लिस्ट फीचर वापरावे लागेल. तुम्ही Google Play Store किंवा Apple App Store वरून IRCTC अॅप डाउनलोड करू शकता. अॅप डाउनलोड केल्यानंतर, IRCTC आयडीने लॉग इन करा. यानंतर तुम्हाला त्यात मास्टर लिस्ट फीचर वापरावे लागेल. मास्टर लिस्ट फीचरमध्ये तुम्ही प्रवाशाचे तपशील भरू शकता. यामुळे तुम्हाला बुकिंगच्या वेळी तपशील द्यावा लागणार नाही आणि तुमचा बराच वेळ वाचेल.

तत्काळ तिकिटांमध्ये वेळ खूप महत्त्वाची असते. यामुळे मास्टर लिस्ट फीचर वापरून कन्फर्म तत्काळ तिकीट मिळण्याची शक्यता खूप वाढते. मास्टर लिस्ट फीचर समाविष्ठ करण्यासाठी तुम्हाला IRCTC अॅप उघडून त्यात लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला दिलेल्या पर्यायातून माय मास्टर लिस्टचा पर्याय निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला प्रवाशांचे सर्व तपशील भरून सेव्ह करावे लागतील. एसीमध्ये तात्काळ बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते. तर स्लीपर तात्काळ बुकिंग सकाळी 11 वाजता सुरू होते.

तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या एक किंवा दोन मिनिटे आधी अॅप उघडा आणि त्यात लॉग इन करा. यानंतर, प्रवासाचा मार्ग निवडल्यानंतर मास्टर लिस्टद्वारे प्रवाशांचे तपशील जोडा. त्यानंतर पेमेंटच्या वेळी UPI चा पर्याय निवडा आणि त्याद्वारे पेमेंट करा. यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि कन्फर्म तत्काळ तिकीट मिळण्याची शक्यता खूप जास्त असेल.

 

First Published on: May 9, 2022 5:40 PM
Exit mobile version