PAN-Aadhar Link: 30 जूनपर्यंत पॅन-आधारशी लिंक केलं नाही तर भरावा लागेल दंड, ‘या’ सेवाही होणार बंद

PAN-Aadhar Link: 30 जूनपर्यंत पॅन-आधारशी लिंक केलं नाही तर भरावा लागेल दंड, ‘या’ सेवाही होणार बंद

aadhar card and pan card link

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी पॅनशी आधार लिंक करण्याबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ३० जून २०२३ पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर ते निष्क्रिय होईल. गुरुवारी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, यापूर्वी पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी खूप वेळ दिला होता. पॅनला आत्तापर्यंत आधारशी लिंक करायला हवे होते. ज्यांनी ते अजून केले नाही त्यांनी त्वरित करावे. नाहीतर, अधिकचा दंड भरावा लागेल, असे अर्थमंत्री निर्मला सितारामण म्हणाल्या आहेत. पॅन-आधारशी लिंक न केल्यास सरकारने 1 हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. यात आता वाढ केली जाणार आहे. PAN Aadhar Link If not linked with PAN-Aadhaar by June 30 fine will be paid this service will also be stopped

पॅन- आधार कार्डला 30 जूनपर्यंत लिंक केले नाही तर, तुम्हाला अनेक सेवांना मुकावे लागेल. तुम्हाला कर्ज देखील घेता येणार नाही. आयडीएफसी फर्स्ट बॅंकेने आपल्या वापरकर्त्यांनी सांगितले आहे की, प्राप्तिकर विभागानुसार, 30 जूनपर्यंत प‌ॅन आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास नवीन कर्ज दिले जाणार नाही. याशिवाय इतर अनेक सेवाही बंद करण्यात येतील.

…तर 1 जुलैपासून पॅनकार्ड निष्क्रीय

इनकम टॅक्स अॅक्ट 1961 नुसार, ज्या लोकांच्या नावे 1 जुलै 2017 पर्यंत पॅनकार्ड जारी झाले आहेत आणि जे आधारकार्डसाठी पात्र आहेत त्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपल्या आधारकार्डशी आपले पॅनकार्ड लिंक करायलाच पाहिजे. सध्या आधारशी पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे अशात ज्या लोकांनी हे काम केलेले नाही त्यांचे पॅनकार्ड 1 जुलै 2023 पासून निष्क्रिय होईल, असे सरकारने म्हटले आहे.

( हेही वाचा :आरबीआयची मोठी घोषणा; रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय )

‌पॅन आधारशी लिंक न केल्यास या सेवा होणार बंद

First Published on: April 6, 2023 6:37 PM
Exit mobile version