Paytm ने मेट्रो, बस आणि रेल्वे तिकिट सेवेसाठी लाँच केले ‘Transit Card’

Paytm ने मेट्रो, बस आणि रेल्वे तिकिट सेवेसाठी लाँच केले ‘Transit Card’

Paytm Payments Bank वर RBI ची कारवाई, नवीन ग्राहक जोडण्यास मनाई, काय आहे कारण ?

ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी जर तुम्ही Paytm चा वापर करत असला तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पेटीएमने मेट्रो, बस, रेल्वे तिकिट आणि पार्किंगचे पैसे भरण्यासाठी Transit Card लाँच केले आहे. या कार्डच्या माध्यमातून तुम्ही मेट्रो, बस, रेल्वेचे तिकिट काढू शकता. रुपे (Rupay) कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व ऑनलाईन वेबसाईटवर या कार्डचा उपयोग करता येणार आहे.

हे Transit Card एक प्रकारे प्रीपेड कार्ड असून जे तुम्ही पेटीएम वॉलेट बॅलेन्सबरोबर देखील लिंक करु शकता. तुम्ही या कार्डच्या माध्यमातून पेटीएम वॉलेट बॅलेन्सचा वापर करु शकता. याशिवाय पार्किंगचे पैसे भरण्यासाठी देखील हे कार्ड वापरु शकता. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने माहिती देत सांगितले की, या कार्डचा उपयोग ऑनलाईन शॉपिंग करण्याबरोबरचं एटीएममधून कॅश विड्रॉल करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

पेटीएम पेमेंट्स बँकचे एमडी सतीश गुप्ता यांनी सांगितले की, पेटीएम Transit Card कार्डचा फायदा म्हणजे देशभरातील लाखो युजर्स एका कार्डच्या माध्यमातून सर्व व्यवहार सोप्प्या पद्धतीने करु शकता. पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि बँकिंग संबंधीत महत्त्वाची कामं लक्षात घेता हे कार्ड लाँच करण्यात आले आहे. या कार्डचा वापर पहिल्यांदा दिल्ली एअरपोर्ट एक्सप्रेस लाईन आणि अहमदाबाद मेट्रो लाईनवर केले जाईल.


Life Certificate : पेन्शनर्स फक्त एक दिवस राहिला शिल्लक; घरबसल्या जमा करा लाईफ सर्टिफिकेट


First Published on: November 29, 2021 7:00 PM
Exit mobile version