आता आधार कार्डवरून मिळणार कर्ज, एसबीआयसह या बँका देत आहेत सुविधा, जाणून घ्या काय आहे योजना?

आता आधार कार्डवरून मिळणार कर्ज, एसबीआयसह या बँका देत आहेत सुविधा, जाणून घ्या काय आहे योजना?

तुमचाही कर्ज (loan) घेण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही आधार कार्डद्वारेही (Aadhar card) कर्ज घेऊ शकता. आजच्या काळात घरातील गॅस सिलिंडरपासून (gas cylinders) ते बँकेच्या कामापर्यंत सर्वत्र आधारचा वापर केला जातो. परंतु आता तुम्ही आधार कार्डच्या मदतीने कर्ज देखील घेऊ शकता.

या बँका देतील कर्ज
तुम्ही आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्जासाठी (personal loan) अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि तेथे जाऊन तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank ) ग्राहक आधार कार्डच्या आधारे कर्ज घेऊ शकतात.

क्रेडिट स्कोअर किती असावा
कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर ( credit score).  कर्ज घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर 750 पेक्षा जास्त असावा. त्यानंतरच तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. 750 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असाल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँक तुम्हाला कमी व्याजदरावर कर्जाची सुविधा देखील देते.

कर्जासाठी अर्ज कसा करता येईल?

First Published on: June 20, 2022 6:56 PM
Exit mobile version