प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 7 कोटी 23 लाख जोडण्या

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 7 कोटी 23 लाख जोडण्या

पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत संपूर्ण देशात ७ कोटी २३ लाख जोडण्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 19 जून 2019 पर्यंत 40,86,878 जोडण्या देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक जोडण्या उत्तर प्रदेश 1,30,81,084, बिहार 79,29,510, तर मध्य प्रदेश 64,70,761 जोडण्या देण्यात आल्या.

पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. एलपीजी जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असून, कुटुंबातल्या प्रौढ महिलेच्या नावाने एलपीजी जोडणी दिली जाते. योजनेसाठी www.pmujjwalayojana.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच योजनेची चौकशी, तक्रारी आणि सुचनांसाठी 18002666696 हा टोल फ्री नंबर आहे.

दरम्यान, एलपीजी जोडण्यांच्या हस्तांतरणासाठी पोर्टेबिलिटीचा पर्याय देशात 2013 पासून सुरू करण्यात आला. तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त अहवालानुसार योजना सुरू झाल्यापासून 18 जून 2019 पर्यंत 4.2 लाखांहून अधिक ग्राहकांनी पोर्टेबिलिटी योजनेंतर्गत ऑनलाईन वितरकाकडे जोडणी हस्तांतरणाचा पर्याय निवडला आहे. 18 जून 2019 पर्यंत 4.2 लक्ष ग्राहकांनी हा पर्याय निवडला.

First Published on: June 26, 2019 5:31 AM
Exit mobile version