पंजाब, युनायटेड, ओरिएंटल बँकांचे होणार विलीनीकरण

पंजाब, युनायटेड, ओरिएंटल बँकांचे होणार विलीनीकरण

पंजाब नॅशनल बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या तीन बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 1 एप्रिल 2020 पासून या तिन्ही बँकांचे कामकाज एकत्रितरित्या चालणार आहे. मात्र बँकांच्या विलीनीकरणानंतर बँकांच्या ग्राहकांना काही बदलांना सामोरे जावे लागू शकते.

या बँकांच्या विलीनीकरणानंतर ग्राहकांना नवीन खाते क्रमांक आणि कस्टमर आयडी मिळू शकतो. यासाठी तुमच्या बँकांमध्ये तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अपडेट असणे गरजेचे आहे. जर तुमच्या खाते क्रमांक किंवा कस्टमर आयडीमध्ये कोणताही बदल झाला, तर बँका तुम्हाला लगेच त्याबाबत कळवू शकते.

बँकांच्या विलीनीकरणानंतर तुमचे चेक बुकही बदलले जाणार आहे. या तिन्ही बँकांच्या विलीनीकरणामुळे जुन्या बँकांच्या चेकबुकचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही. त्याऐवजी बँकांकडून तुम्हाला नवीन चेकबुक दिले जाईल. मात्र यासाठी ग्राहकांना काही दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे.

विलीनीकरणानंतर बँकेतील ग्राहकांना अकाऊंट नंबर आणि IFSC या माहितीत बदल होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना इन्कम टॅक्स, म्युच्युअल फंड, इन्श्युरन्स कंपनी यासह विविध तपशीलमध्ये बदल करावा लागणार आहे.

First Published on: September 17, 2019 1:09 AM
Exit mobile version