PNB बँकसह BOIच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, RBI ने या बॅंकांवर ठोठावला ६ कोटींचा दंड

PNB बँकसह BOIच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, RBI ने या बॅंकांवर ठोठावला ६ कोटींचा दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ इंडिया (BOI) या दोन बँकांना तब्बल ६ कोटीचा दंड ठोठावला आहे. यामुळे तुमचे जर पीएनबी बँकेत आणि बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. या दोन बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन्ही बँकांना दंड ठोठावला आहे. यामध्ये पीएनबी बँकेला २ कोटीचा दंड आकारण्यात आला आहे. तर बँक ऑफ इंडियाला ४ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निकषांचे उल्लंघन केल्यामुळे आणि ग्राहकांची फसवणूक केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे.

पीएनबी आणि बँक ऑफ इंडियामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे आरबीआयकडून ३१ मार्च २०१९ रोजी वैधानिक तपासणी करण्यात आली होती. बँक ऑफ इंडियाच्या इन्स्पेक्शन ऑफ सुपरवायजर इव्हॅल्यूएशनबाबत तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत बँकेकडून ग्राहकांची फसवणूक झाली असल्याची समीक्षा करण्यात आली असून याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

आरबीआयच्या अहवालात खुलासा

बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत पीएनबी बँकेत वैधानिक तपासणी करण्यात आली आहे. याबाबत आरबीआयने अहवाल सादर केला आहे. यामध्ये जोखीम मुल्यांकन अहवालाच्या तपासणीनंतर आरबीआयच्या निकषांचे उल्लंघन करण्यात आलं असल्याचे प्रकर्षणाने समोर आले आहे.

दोन्ही बँकांना आरबीआयची नोटीस

आरबीआयच्या निकषांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयकडून PNB आणि BOI अशा दोन्ही बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये बँकेला दंड का आकारु नये असे कारण विचारण्यात आलं आहे.

यापुर्वीही आरबीआयनं ठोठावलेत दंड

नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँकेवर १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तर बँकिंग रेग्युलेशन कायदा कलम ६(२) आणि कलम ८ मध्ये करण्यात आलेल्या तरतुदींचे उल्लंघन झाल्यामुळे एचडीएफसी या खासगी बँकेला आरबीआयनं १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

First Published on: June 8, 2021 11:48 AM
Exit mobile version