उल्हासनगरात जुन्या करयोग्य मूल्य पद्धतीने वसुली-अतिरिक्त आयुक्त

उल्हासनगरात जुन्या करयोग्य मूल्य पद्धतीने वसुली-अतिरिक्त आयुक्त

उल्हासनगर । राज्य सरकारने भांडवली कर मूल्य लागू करण्याच्या प्रक्रियेवर स्थगिती दिल्यानंतर कोणत्या दराने मालमत्ताकरांची वसुली करायची असा पेच उल्हासनगर महापालिकेसमोर निर्माण झाला होता. परंतु महानगरपालिकेने आता जुन्या करयोग्य मूल्य पद्धतीने करांची वसुली करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.

मागच्या काही महिन्या पूर्वी उल्हासनगर महानगर पालिकेच्या वतीने भांडवली मूल्यकर लागू केल्याने शहरातील एक लाख 80 हजार मालमत्ता धारकांमध्ये खळबळ उडाली होती. या भांडवली मूल्य कराच्या विरोधात शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. आमदार कुमार आयलानी, शिवसेना शिंदे गटाचे अरुण आशान, शहर संघटक नाना बागुल यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटून घालून भांडवली मूल्य कर रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच राजेंद्र सिंग भुल्लर यांनी अ‍ॅडव्होकेट प्रकाश कुकरेजा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात भाडंवली मूल्य कराविरोधात याचिका दाखल केली होती. दुसरीकडे वालधुनी बिरादरी, हिराली फाउंडेशन,सिटीजन फाउंडेशन यांनी भांडवली कराचा मुद्दा उचलून धरला होता.

First Published on: December 4, 2022 7:45 PM
Exit mobile version