SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढली

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढली

KYC अपडेशनच्या नावाखाली बँक खात साफ

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. कारण कोरोना संकटात SBI आपल्या ग्राहकांसाठी मोठा दिलासाजनक निर्णय घेतला आहे. या निर्णयात बँकेतून एका दिवसात खात्यातून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे. यामुळे SBI च्या ४६ कोटी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. SBI या नव्या नियमानुसार, आता ग्राहक एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन पैसे काढण्याचा फॉर्म भरत दिवसाला २५ हजार रुपये काढू शकणार आहेत. त्यामुळे एसबीआयचे ग्राहक चेक आणि पैसे काढण्याच्या फॉर्मच्या माध्यमातून नॉन-होम ब्रँकडून वाढवलेल्या मर्यादेपर्यंत पैसे काढू शकणार आहे. यासंदर्भातील माहिती SBI ने आपल्या अधिकृत
ट्विटर हँडलवरून दिली आहे.

पैसे काढण्याचे बदलेले नियम

१) ग्राहक एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन फॉर्मच्या माध्यमातून बचत खात्यातू २५००० रुपये काढू शकणार आहेत.

२) चेकद्वारे दुसऱ्या शाखेतून १ लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत.

३) थर्ड पार्टी म्हणजे ज्याला चेक देण्यात आला आहे. त्याला पैसे काढण्याची मर्यादा ५०,००० रुपये केली आहे.

नवीन नियमाची मुदत

एसबीआयने तातडीने हे नवीन नियम लागू असून हा नवीन नियम ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत.

नवीन नियमांसह अटी

पैसे काढण्याच्या नवीन नियमांसह एसबीआयने काही अटी देखील लागू केल्या आहेत. थर्ड पार्टी विड्रॉल फॉर्मद्वारे (Withdrawal form) रोख रक्कम काढू शकणार नाही. तसंच, थर्ड पार्टीकडे केवायसी कागदपत्र (KYC Documents) असणे गरजेचे आहे.


 

First Published on: May 31, 2021 2:09 PM
Exit mobile version