Online Fraud पासून वाचण्यासाठी फॉलो करा SBI च्या ‘या’ खास टिप्स

Online Fraud पासून वाचण्यासाठी फॉलो करा SBI च्या ‘या’ खास टिप्स

KYC अपडेशनच्या नावाखाली बँक खात साफ

सध्या ऑनलाईन केवायसीच्या नावाने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. ऑनलाईन ठग SMS किंवा लिंकच्या माध्यमातून ग्राहकांना जाळ्यात ओढले जाते. परंतु या ऑनलाईन फसवणूकीपासून वाचण्यासाठी SBI ने ग्राहकांसाठी काही नव्या सुचना जाहीर केल्या आहेत.

SBI ने आपल्या निविदेनात म्हटले आहे की, ग्राहकांनी कोणताही पर्सनल माहिती कोणासोबतही ऑनलाईन शेअर करु नका, अज्ञात व्यक्तींकडून येणाऱ्या मेसेज किंवा अॅप डाऊनलोड करुन नका. तसेच बँकेन फसवणूक करणाऱ्या लोकांपासून अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Online Fraud वाचण्यासाठी SBI महत्त्वाच्या टिप्स

ग्राहकांनी आपली महत्त्वाची वैयक्तिक माहिती, जन्मतारीख, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिंग, युजर आयडी/पासवर्ड, डेबिडकार्ड पिन नंबर, सीवीवी, ओटीपी कोणासोबतही शेअर करुन नका.

१)बनावट कॉल करणाऱ्या अज्ञातांपासून सावध रहा, हे फसवणूक करणारे कॉलर आपण एसबीआय, आयबीआय किंवा पोलीस स्टेशनमधून किंवा केवायसी अथॉरिटीमधून बोलतोय असे सांगतो.

२) कोणत्याही अज्ञात नंबर किंवा मेलद्वारे येणाऱ्या कोणत्याही अॅपच्या लिंकवर क्लिक करुन नका किवा डाऊनलोड करुन नका.

३) ईमेल, मेसेज किंवा अन्य सोशल मीडिया माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही ऑफरवर लक्ष देऊ नका, किंवा कितीही आकर्षक ऑफर वाटली तरी त्यासंबंधीत लिंकवर क्लिक करुन नका.

ONLINE KYC UPDATE पासून सावध 

SBI ने योर कस्टमर म्हणजेच (KYC)च्या नावे होणारी ग्राहकांची फसवणुक होण्यापासून वाचण्यासाठी काही सुचना केल्या आहेत. सध्या देशात ऑनलाइन KYC च्या नावे होणारी फसवणुक ग्राहकांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. परतु या ऑनलाइन फसवणुकीपासून तुमचे बँक अकाउंट सुरक्षित ठेवायचे असल्यास खालील गोष्टी फॉलो करा,

१) कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा.

२) कारण कोणतीही बँक KYC UPDATE साठी कोणताही लिंक पाठवत नाही.

३) आपल्या मोबाईलमधील किंवा आपली पर्सनल माहिती कोणाबरोबर शेअर करुन नका.


 

First Published on: June 18, 2021 6:08 PM
Exit mobile version