शेअर बाजारात सेंसेक्स ३०७ अंकांनी घसरला

शेअर बाजारात सेंसेक्स ३०७ अंकांनी घसरला

शेअर बाजार

आज सकाळी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सकाळच्या वेळात शेअर बाजार सुरू होताच सेंसेक्स ३०७ अंकानी घसरला. या आजच्या सेंसेक्सच्या परिस्थितीत ३०७ अंकांनी कोसळल्याने गेल्या पाच महिन्यातील सर्वांत निचांकावर पोहोचला आहे. यावेळी रूपयांच्या मूल्यात देखील घसरण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या मूल्यात ७२.०३ पर्यंत घसरण झाली आहे.

गुरूवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याने रूपयाच्या मूल्यात देखील खूप घसरण झाली होती. यामुळे सोन्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे. गुरुवारी शेअर बाजाराचा निर्देशांक ३६,४७२.९३ अंकावर येऊन त्याची घसरण झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७७.३५ अंकांनी घसरून १०,७४१.३५ अंकावर बंद झाला होता. रुपयाही २६ पैशांनी घसरल्याने एक डॉलरची किंमत ७१.८१ रुपये झाली होती. हा रुपयाचा आठ महिन्यांचा नीचांक ठरला होता. या रूपयांच्या नीचांकामुळे सोन्यात १५० रूपयांनी वाढ झाल्याने ३८,९७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले तर चांदीही ६० रुपयांनी वाढून ४५,१०० रुपये किलो झाली होती.

First Published on: August 23, 2019 1:06 PM
Exit mobile version